Dhangar Reservation : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण नाहीच! मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका

Dhangar Reservation latest News : धनगर समाजाकडून एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी करण्यात येत होती.
dhangar reservation high court
dhangar reservation high court
Updated on

Dhangar Reservation latest News : धनगर समाजाकडून एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान धनगर आरक्षणाची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. राज्यातील संपूर्ण धनगर समाजाचे या निकालाकडे लक्ष लागले होते, दरम्यान याचिका फेटाळल्याने हा धनगर समाजासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मागिल अनेक दिवसांपासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या याचिकेवर सुनावणी सुरू होती. ती पार पडल्यानंतर आज न्यायालयाने निकाल दिला आहे. जस्टीस पटेल आणि जस्टीस कमल खटा यांच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे की, अशा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्हाला हस्तक्षेप करता येणार नाही, धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देण्याचा आम्हाला अधिकार नाही. हा सर्वस्वी अधिकार संसद आणि संसदमंडळाचा आहे. कायद्यात दुरुस्ती करत संसदेतूनच हे आरक्षण दिलं जाऊ शकतं. असं म्हणत एसटीमधून आरक्षण देण्यासंबंधीत सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळल्या आहेत.

dhangar reservation high court
Sonia Gandhi Property : 88 किलो चांदी, सव्वा किलो सोनं...इटलीत देखील प्रॉपर्टी! सोनिया गांधींची संपत्ती ५ वर्षात किती वाढली ?

धनगर समाजाला एसटी म्हणजेच अनुसूचित जमातींमधून आरक्षण मिळावं यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन शुरू आहे. मागील काही दिवसात राज्यभरात या आंदोलनाची तिव्रता वाढताना दिसत आहे.

दरम्यान हायकोर्टाच्या या निर्णयानंतर धनगर समाजाकडे सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय शिल्लक आहे. आता धनगर समाज, याचिकाकर्ते आणि नेतेमंडळी पुढील कायदेशीर भूमिका काय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

dhangar reservation high court
Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराचे चांदीचे नाणे अर्थ मंत्रालयाने केले जारी; कसे आणि कुठे खरेदी करायचे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.