Dhangar Reservation: धनगर आंदोलक वर्षा निवासस्थानी; जोरदार घोषणाबाजी करत दिला निर्वाणीचा इशारा

Dhangar Reservation
Dhangar Reservationsakal
Updated on

मुंबईः धनगर आरक्षणाचा मुद्दा तापत चालला आहे. मंगळवारी आंदोलकांनी मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या घेतल्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाहेर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.

धनगर बांधवांनी वर्षा निवासस्थानासमोर घोषणाबाजी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. सरकारने धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा जीआर तात्काळ काढावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

वर्षा निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या धनगर बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे वर्षा निवासस्थानी जाणार आहेत. धनगर आरक्षणाच्या बाबतीत सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

दुसरीकडे याच मुद्द्यावरून धनगर समाज दुपारी आक्रमक झाला. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचे काही कार्यकर्ते मंत्रालयात आले.. यावेळी त्यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या. तसेच जोरदार आंदोनल छेडले. त्यानंतर गोंधळ निर्माण झाला होता.

यावेळी पोलिसांनी धावपळ करत आंदोलकांना जाळीवरुन काढले. मंत्रालयाच्या प्रत्येक माळ्यावर आंदोलकांना बघण्यासाठी गर्दी झाली होती. त्यानंतर आंदोलकांनी आपल्या आरक्षणासंबंधीच्या मागण्या सरकारकडे पोहोचवल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.