Ambadas Danve : बँक खाते मोदींनी स्वतःच्या पैशाने उघडले का? अंबादास दानवेंचा सवाल

Ambadas Danve
Ambadas Danve
Updated on

मुंबई - पंतप्रधान मोदींनी ६० टक्के लोकांचे बँकेत खातं उघडलं, ते काय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:च्या पैशाने उघडले का, असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मुंबईत गणेशोत्सवाचा देखावा पाहिल्यानंतर दानवे बोलत होते.

Ambadas Danve
Ajit Pawar : "माझं ते काम नाही..."; शरद पवार-प्रफुल्ल पटेलांच्या त्या फोटोवर अजित पवार स्पष्टच बोलले

दानवे म्हणाले की, खाते उघडले म्हणजे काय मोदींनी स्वतःच्या पैशाने उघडले का? जनधन खात्याची स्थिती काय आहे, हा पैसा कोन वापरतो, उलट 15 लाख खात्यात टाकणार होते त्याचे काय झाले? असा प्रश्नही दानवे यांनी उपस्थित केला.

शिंदे गटाबाबत बोलताना दानवे म्हणाले की, रात्री अपरात्री बैठका घेणारे हे गद्दार लोक आहेत, त्यांच्याविषयी काय बोलणार, पण गणराज आहे. ते सोंड बरोबर फिरवेल आणि गद्दारांना धडा शिकवेल.

Ambadas Danve
'आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेला चांगला दर, उसाला 400 रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता द्या'; राजू शेट्टींची साखरमंत्र्यांकडं मागणी

गणपतीच्या देखाव्याबाबत, दानवे म्हणाले की, पर्यावरणाच्या रक्षणासाठी असे देखावे साकारणे गरजेचे आहे. नवी मुंबईतील पर्यावरण हा मोठा प्रश्न आहे. नवी मुंबईतील अनेक डोंगर लोकांनी खोदले, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. पर्यावरण हे जपण्याची गरज असल्याचंही दानवे यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.