रावसाहेब दानवेंसोबत खरंच हातमिळवणी केली का? खोतकर म्हणाले...

कट्टर राजकीय विरोधक असलेल्या रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची नुकतीच भेट झाली होती त्यामुळं राजकीय वर्तुळात त्यांची हातमिळवणी झाल्याची चर्चा होती.
Arjun Khotkar says I Love Raosaheb Danve at Loksabha Public Meeting in Jalna
Arjun Khotkar says I Love Raosaheb Danve at Loksabha Public Meeting in Jalna
Updated on

जालना : कट्टर राजकीय विरोधक असलेले भाजपचे खासदार रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची नुकतीच भेट झाली होती. यामुळं दोघांमध्ये हातमिळवणी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. यावर आज पत्रकार परिषदेत खुद्द खोतकर यांनी स्पष्टीकरण दिलं. (Did Raosaheb Danave and Arjun Khotkar really join hands with eachother)

Arjun Khotkar says I Love Raosaheb Danve at Loksabha Public Meeting in Jalna
खोतकरांचा शिंदे गटाला पाठींबा जाहीर; उद्धव ठाकरेंची साथ सोडताना अश्रू अनावर

खोतकर म्हणाले, "रावसाहेब दानवेंनी मला चहा घेण्यासाठी मला घरी बोलावलं होतं. यानिमित्तानं तीन वर्षांनतर आम्ही बोललो. साला एखादा दुश्मन जरी असला तरी तो चहा घ्यायला बोलावतो म्हटल्यानंतर आपण कसं जायचं नाही, असं मला वाटलं आणि मी त्यांच्या भेटीला गेलो. त्यानंतर ओघानेच जालन्यातील लोकसभेच्या जागेचा विषय निघाला"

Arjun Khotkar says I Love Raosaheb Danve at Loksabha Public Meeting in Jalna
महाराष्ट्राबद्दल आपुलकी नसलेल्या राज्यपालांना दुसरीकडं पाठवा - काँग्रेस

दानवे मला म्हणाले, तुम्ही मला लोकसभेला समर्थन द्या, तुम्हाला दुसरी जागा देता येईल. कारण ही जागा भाजपची असून मीच सध्या इथला विद्यमान खासदार आहे. मग मी त्यांना म्हटलं की, हा निर्णय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाका. एवढचं फक्त या लोकसभेच्या जागेबाबत आमचं बोलणं झालं. पण मी अद्याप या जागेचा आग्रह सोडलेला नाही. शिंदेंशी मी लोकसभेसाठी कुठलीही मागणी केलेली नाही. ती रावसाहेब दानवेंकडं केली आहे. "तुम्ही अनेक वर्षे इथून लढलात आता ती मला लढवू द्या असं मी त्यांना म्हटलोय. यासाठी आत्तापर्यंत ज्या अडचणींचा आम्ही सामना केलाय तो आजही करु" असंही यावेळी खोतकर म्हणाले.

ईडीच्या भीतीनेच शिवसेनेचे आमदार शिंदेंच्या बाजूनं का?

ईडीच्या भीतीनेच शिवसेनेचे आमदार शिंदेंच्या बाजूनं गेलेत का? या प्रश्नावर अर्जुन खोतकर म्हणाले, मी माझ्यापुरत तुम्हाला सांगितलं. इतरांचं मी काही सांगू शकत नाही. मला शिंदे गटात गेल्यामुळं थोडा बहुत तरी दिलासा मिळेल अशी आशा आहे. विधानपरिषद उमेदवारी मिळावी वैगरे अशी मी कुठलीही अट ठेवलेली नाही. माझ्यासोबत यावं असं आवाहन मी कोणत्याही शिवसैनिकाला केलेली नाही.

उद्धव ठाकरेंबाबत कधीही वाईट बोलणार नाही - खोतकर

ज्या पक्षात मी ४० वर्षे काढली त्या पक्षाबद्दल आणि पक्षप्रमुखांबद्दल मी कधीच वाईट बोलणार नाही. शिंदे गटातील नेत्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनीही कोणाचं वस्त्रहरण करु नये. शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर मी शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा देणार आहे. एखाद्या प्रसंगासाठी जर उद्धव ठाकरेंना भेटण्याची वेळ आली तर मी जरुर जाईन. आमचचं ते घर आहे आमचे संबंध तुटणार नाहीत, असंही अर्जुन खोतकर यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()