'तुमचा अजाणचा भोंगा म्हणून आम्ही…'; मनसेच्या भूमिकेवर वळसे पाटलांची प्रतिक्रिया

Dilip Walse Patil
Dilip Walse PatilDilip Walse Patil
Updated on

राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणानंतर राज्यात वगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रार्थनेला विरोध नाही. मात्र, भोंगे काढावे लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावाच लागले. अन्यथा आम्ही भोंग्यांविरोधात दुप्पट लाउडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाचवू, असा इशारा दिला होता, यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते साम टीव्हीवर घेण्यात आलेल्या मुलाखतीदरम्यान बोलत होते.

वळसे पाटील म्हणाले की, "प्रत्येकाने मर्यादा पाळायला पाहिजे. अजाणसाठी भोंगा लावा आणि हनुमान चालीसासाठी पण लावा. पण, नियम पाळा, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. तुमचा अजाणचा भोंगा आहे म्हणून आम्ही हनुमान चालिसा लावू, हा काही महाराष्ट्राचा विकासाचा विषय होऊ शकत नाही. तिकडे अजाण सुरू होते त्यावेळी आम्ही इकडे हनुमान चालिसा लावू हे योग्य नाही. काही विरोधकांनी न्यायालयात जाऊ, अशी धमकी दिली. त्यानंतर न्यायालय काय निर्णय देतंय हे पाहावे लागेल, असं वळसे पाटील म्हणाले.

Dilip Walse Patil
'मनसे ही भाजपची सी टीम तर MIM..'; आदित्य ठाकरेंचे राज ठकरेंवर टिकास्त्र

मग कधी हिंदू मुस्लिम जात धर्म वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून हे घडतं तेव्हा दुसऱ्या राज्यात घडलेल्या घटनांचे सुध्दा मोर्चे या राज्यात काढले जातात तेव्हा राजकारणाचा दर्जा खूप खसरला आहे असं वाटत, त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे असे ते म्हणाले. प्रत्येकाला आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत, अजाणसाठी आणि हनुमान चालीसा लावायची आहे त्यांनी जरुर लावावी पण डेसिबलची मर्यादा पाळावी असे गृहमंत्री म्हणाले.

Dilip Walse Patil
नाशिकजवळ रेल्वेचे डबे रुळावरुन घसरले; एक ठार, 5 प्रवासी जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.