मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज शुक्रवारी (ता.आठ) अचानक जे अनिष्ट वळण लागले ते अनुचित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी व अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे, अशी टीका राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी विरोधकांवर केला. (Dilip Walse Patil Say, ST Workers Agitation In Front Of House Of Sharad Pawar Not Good)
आज अचानक संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर चप्पल फेकत आंदोलन केले. या घटनेवर वळसे पाटील यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने चर्चेचा मार्ग नेहमीच मोकळा ठेवला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करणे क्रमप्राप्त आहे. सांविधानिक मार्गाने तसेच संवादाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रश्न समोर मांडावेत, असे आवाहन त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी केले. आंदोलनाला अनिष्ट वळण देऊन कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये, असे आंदोलकांना नम्र आवाहन आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी कर्मचाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपण चर्चा करण्यास तयार आहोत. तुम्ही शांता व्हा, असे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन मागे भाजप असल्याचा आरोप केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.