अन्ननीतीचा वापर करत शिस्तीचा वस्तुपाठ

शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवस जेवणाच्या व्यवस्थित ठिकाणची पाहणी केली.
अन्ननीतीचा वापर करत शिस्तीचा वस्तुपाठ
Updated on

नाशिक : ‘अन्‍न परमो धर्म’ असे अनेक जण म्हणतात. प्रत्यक्षात मात्र त्याची कुणासही आठवण राहत नाही. या वाक्याची खरी शिकवण आदिवासी बांधवांनी १५ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात करून देण्याचे काम केले.

मोठे उत्सव, सोहळे, कार्यक्रमांत आयोजकांकडून भोजनाची व्यवस्था केली जाते. उपस्थित मान्यवरांसह सोहळ्यातील पाहुणे मोठ्या आनंदाने भोजनाचा आस्वाद घेतात. त्या आनंदाच्या भरात आणि गप्पागोष्टींच्या रंगात इतके रंगून जातात की त्यांना ताटात किती अन्न घेतले या गोष्टीचा विसर पडतो. शेवटी काय तर पोट भरल्यानंतर उरलेले अन्न त्यांच्याकडून ताटामध्ये तसेच सोडले जाते. यामुळे अन्नाची नासाडी होऊन ते फेकण्यात येते. परंतु जो राबतो त्यालाच कळते अन्नाचा एक दाणा घडण्यासाठी किती कष्ट करावे लागतात. यामुळे त्यालाच अन्नाचे मोल कळत असते. म्हणूनच त्यांच्याकडून अन्नाची नासाडी होणार नाही. याकडे लक्ष दिले जाते. असेच काहीसे चित्र विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या प्रांगणात बघावयास मिळाले.

कष्टकरी जनतेचे संमेलन म्हणजेच विद्रोही मराठी साहित्य संमेलन असे प्रत्येक मान्यवरांनी त्या ठिकाणी बोलून दाखविले. त्यांच्या बोलण्यातील सार तंतोतंत या ठिकाणी जुळले. आदिवासी बांधवांसह सर्वसामान्य जनता या संमेलनास उपस्थित होती. त्यांच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली होती. येथील जेवणाच्या व्यवस्थेत अतिशय सुसूत्रता दिसून आली. अनाडी म्हणवणाऱ्या या जनतेने आपण किती हुशार आहोत याचे उत्तम उदाहरण या ठिकाणी घालून दिले. अतिशय व्यवस्थितरीत्या आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी जितक्या अन्नाची गरज आहे तितकेच अन्न त्यांनी आपल्या ताटात घेतले. ताटात उष्टे पडणार नाही, याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली.

शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवस जेवणाच्या व्यवस्थित ठिकाणची पाहणी केली. कुठल्याही प्रकारचे अन्न फेकल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे या ठिकाणी अन्नाची नासाडीही झाली नाही, तर भोजनव्यवस्थेची जबाबदारी घेतलेले योगेश कापसे केटरर्स यांनीही ‘ना तोटा ना नफा’ या तत्त्वावर सामाजिक बांधिलकी जपत जबाबदारी पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.