Sharad Pawar: राज्यात घडामोडींना वेग! CM एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात फोनवरुन चर्चा

एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती
Sharad Pawar
Sharad PawarEsakal
Updated on

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी आणि चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. बारसू येथील प्रकल्पामद्धे शरद पवार आता मध्यस्थी करणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांनी बारसू येथील जागेसंदर्भात केंद्राला पत्र दिल होतं. त्यामुळे या प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे अशी चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाच्या नेत्यानी स्थानिकांची बाजू घेतली आहे. अशातच शरद पवार बारसूच्या संदर्भात माहिती घेत आहेत.

या दरम्यान शरद पवार यांनी सकाळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी काल चर्चा केली त्यानंतर आज त्यांनी भेट घेतली. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

Sharad Pawar
Ajit Pawar: चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या बैठकीला अजित पवारांची गैरहजेरी

ठाकरे गटाच्या खासदार-आमदारांना बारसूला जाण्यापासून पोलिसांनी रोखलं

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत स्थानिक नेते आणि पदाधिकारी यांच्यासोबत बारसू येथील स्थानिकांची भेट घेण्यासाठी गेले असताना त्यांची गाडी अडवण्यात आली आहे. रानतळे चेकपोस्टवर विनायक राऊत यांची गाडी अडवण्यात आली आहे. बारसू येथे कलम 144 लागू केलं असल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Sharad Pawar
Refinery Project: वातावरण तापलं! ठाकरे गटाच्या खासदार-आमदारांना बारसूला जाण्यापासून पोलिसांनी रोखलं

कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच - राजन साळवी

राजन साळवी यांनी आज ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच....माझ्या विरोध करणाऱ्या नागरिकांना प्रकल्पाची बाजू पटवून प्रशासनाने द्यावी, त्यांच्यावर अन्याय करू नये, अशी मागणी राजन साळवी यांनी केली आहे. तसेच राजन साळवी यांनी मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री कार्यालयाचे यांचे ट्विटवर अकाऊंट आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेन्शन केले आहे.

Sharad Pawar
Eknath Shinde :एकनाथ शिंदे भाजपला नकोसे झाल्याची चर्चा; भाजपमधील वरिष्ठ नेते मुख्यमंत्र्यांवर नाराज?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.