INDIA Alliance : मोदी सरकारकडून राज्यघटनेतून 'इंडिया' शब्द हटवण्याची चर्चा; वडेट्टीवारांची तिखट प्रतिक्रिया

संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबत विधेयक येणार असल्याची चर्चा
vijay wadettiwar on municipal elections during corona sure in maharashtra
vijay wadettiwar on municipal elections during corona sure in maharashtra sakal
Updated on

New Delhi News : राज्यघटनेतून भारतासाठी वापरण्यात येणारा 'इंडिया' हा शब्द हटवण्याच्या हालचाली मोदी सरकारकडून सुरु असल्याची चर्चा आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबत विधेयकही आणण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावर विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. (Discussion of removing the word India from Constitution by Modi govt Vijay Wadettivar Comment)

vijay wadettiwar on municipal elections during corona sure in maharashtra
INDIA आघाडीत महत्वाच्या हालचाली! समन्वय समितीची पहिली बैठक 'या' दिवशी होणार

सरकारचं अधःपतन होणार

वडेट्टीवार म्हणाले, विरोधकांच्या इंडिया आघाडीला हे लोक घाबरले आहेत, भांबावले आहेत. भाजपचे लोक डरपोक आहेत त्यामुळं ते विषयांना फाटे फोडण्याचं काम करत आहेत. हे लोक घमेंडीला असं संबोधतात, पण घमेंडी कोण आहे? हे देशाला माहिती आहे. इंडिया आघाडी मजबूत आहे. पण काहीही केलं तरी या सरकारचं अधःपतन इंडियात झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

विरोधकांच्या आघाडीला 'इंडिया' नाव अन् मोदींचा संताप

दरम्यान, विरोधकांनी मोदी सरकारविरोधात तयार केलेल्या आघाडीला इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इनक्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) हे संक्षिप्त नाव दिल्यानं पंतप्रधान मोदींनी संताप व्यक्त केला.

त्यांनी भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत विरोधकांच्या या आघाडीवर टीका करताना 'ईस्ट इंडिया कंपनी', इंडियन मुजाहिद्दीन या संघटनांमध्ये देखील 'इंडिया' नाव आहे. त्यामुळं विरोधकांची इंडिया आघाडी देखील तशीच आहे असं म्हटलं होतं. इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना ब्रिटिशांनी केली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.