Disha Salian Death: आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आज स्थापन होणार SIT

राज्य सरकारकडून एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश जारी करण्यात आले आहेत.
disha salian
disha saliansakal
Updated on

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आजच एसआयटी स्थापन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडून लेखी आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री दिशा सालियान(Disha Salian) मृत्यू प्रकरणी सरकारकडून SIT चौकशी केली जाणार आहे. याबाबतची माहिती दोन दिवसांपूर्वीच देण्यात आली होती. त्यानंतर आज (मंगळवार, १२ डिसेंबर) राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश जारी करण्यात आले आहेत.(Latest Marathi News)

दिशा सालियान(Disha Salian) मृत्यू प्रकरणी विरोधकांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेच. त्याचबरोबर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली होती.

दरम्यान. दिशा सालियन(Disha Salian) मृत्यू प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी वारंवार केली जात होती. त्यानंतर आता एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिल्याने आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंबधीचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

disha salian
Winter Session Nagpur: विधानभवनावर मोर्चांचा झंझावात काँग्रेसच्या विराट मोर्चासह १४ संघटनांचा हल्लाबोल, परिसर दणाणला

काय आहे दिशा सालियन मृत्यू प्रकरण?

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा 14 जून 2020 रोजी मृत्यू झाला होता. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या पाच दिवस आधी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिचा संशयास्पद मृत्यू झाला होता.(Latest Marathi News)

मालाडमधील एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन पडून दिशाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा संबंध असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले.

disha salian
Weather Update: उत्तर भारतात थंडीची लाट; कोकणासह 'या' भागात आजही पावसाची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.