NCP Politics: जुनी भाकरी फिरेना अन्‌ नव्यासाठी पीठही मिळेना! राष्ट्रवादी पदाधिकारी बदल रखडला

राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी बदल रखडल्यामुळे शहर-जिल्हा राष्ट्रवादीत निरुत्साह
sharad pawar
sharad pawaresakal
Updated on

प्रदेश व राष्ठ्रीय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाकरी फिरविण्याचा शब्द कमालीचा लोकप्रिय झाला आहे. जिल्हा राष्ट्रवादीत जुनी भाकरी अक्षरश: करपून गेली आहे. नव्या भाकरीसाठी आज पीठ मळले जाईल, उद्या मळले जाईल याचीच वाट पाहण्यात नव्या पिढीतील कार्यकर्ते हताश दिसत आहेत. वर्षानुवर्षे तेच पदाधिकारी पदाला चिटकून बसल्याने सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादीत सध्या कमालीचा निरुत्साह दिसत आहे.

तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात झाली होती. या बैठकीत शहर व जिल्हा राष्ट्रवादीतील पदाधिकारी बदलाची चर्चा झाली होती. बैठक होऊन कित्येक महिने उलटले तरीही अंतिम निर्णय काही झालाच नाही. जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांच्या बदलाच्या अधून-मधून चर्चा होतात.

जिल्हाध्यक्ष साठे आयत्या वेळी काही तरी खेळी करतात आणि हा विषय पुन्हा चर्चेपुरताच मर्यादित राहतो. तशीच स्थिती शहराध्यक्ष भारत जाधव, महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे व युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या बाबतीत आहे. वर्षानुवर्षे एकाच व्यक्तीला त्या पदावर राहण्याची संधी मिळाल्यास अन्य इच्छुकांना कधी संधी मिळणार? राष्ट्रवादी सत्तेत असताना त्याच व्यक्तींना संधी देतो आणि सत्ता गेल्यानंतरही पक्षाचे पद त्याच व्यक्तीकडे ठेवतो यामुळे राष्ट्रवादीत शिथिलता दिसत आहे.

sharad pawar
Ajit Pawar: 'दिवाळीत पुन्हा भूकंप, अजित पवार शांत बसणार नाहीत', अंजली दमानियांच्या दाव्याने पुन्हा चर्चेला उधाण

जिल्हा राष्ट्रवादीत जिल्हाध्यक्षपदासाठी माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, माळशिरसचे नेते उत्तम जानकर या नावांची अधून-मधून चर्चा होते. शहराध्यक्ष, युवक शहराध्यक्ष, शहर महिलाध्यक्ष बदलाच्या बाबतीतही तशीच स्थिती आहे. प्रत्यक्षात निर्णय मात्र काहीच होत नाही.

शहर राष्ट्रवादीत माजी महापौर महेश कोठे, माजी महापौर ॲड. यु. एन. बेरिया, माजी महापौर नलिनी चंदेले, माजी उपमहापौर तौफिक शेख व प्रमोद गायकवाड यांनी प्रवेश केला आहे. त्यांचा प्रवेश होऊन अनेक महिने लोटले तरीही त्यांना राष्ट्रवादीत मनासारखे काम करण्यास संधी मिळते का? याचा कानोसा घेण्याची नितांत आवश्‍यकता आहे. जिल्हा परिषद, नगरपरिषद, महापालिकांच्या निवडणुकांना आणखी अवधी आहे. आता नवीन पदाधिकारी निवडल्यास त्यांना या निवडणुकांपूर्वी अपडेट होण्याची संधी मिळेल.

sharad pawar
Accident News: बुलडाण्यात 2 कार आणि एका दुचाकीचा भीषण अपघात; 3 जणांचा जागीच मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.