खासदार नवनीत राणा आणि आनंदराव अडसूळ यांच्यात वादाची ठिणगी कधी पडली?

navneet rana and anandrao adsul
navneet rana and anandrao adsule sakal
Updated on

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाने (mumbai high court) आज शिवसेना नेता आनंदराव अडसूळ (shivsena leader anandrao adsul) यांच्या याचिकेवर सुनावणी घेतली. त्यामध्ये खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र न्यायालयाने रद्द (high court cancelled caste certificate of navneet rana) केले आहे. त्यामुळे आता नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात येणार का? अशाही चर्चा रंगल्या आहेत. मात्र, आता नवनीत राणा आणि आनंदराव अडसूळ यांच्यामध्ये नेमका काय वाद होता? ते आपण पाहुयात. (dispute between navneet rana and shivsena leader anandrao adsul)

navneet rana and anandrao adsul
ब्रेकिंग! नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात? कोर्टानं जात प्रमाणपत्र केलं रद्द

आनंदराव अडसूळ आणि नवनीत राणा वाद -

नवनीत राणा यांनी २०११ साली राजकारणामध्ये प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर २०१४ ची लोकसभा निवडणूक देखील लढविली. मात्र, यामध्ये सेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीपूर्वी एका टीव्हीवरील कार्यक्रमामध्ये नवनीत राणा आणि खासदार आनंदराव अडसूळ यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यानंतर नवनीत राणा यांनी अडसूळांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार गाडगेनगर पोलिसांनी निकाली काढली होती. मात्र, त्यावेळी राणा यांना कळविण्यात आले नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. तसेच अडसूळ यांनी राजकीय दबाबतंत्राचा वापर करून हे प्रकरण निकाली काढल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. त्यानंतर राणा यांनी ४ जून २०१८ ला पुनर्विचार याचिका दाखल केली होती. हे प्रकरण निकाली लागत नाहीतर २०१८ ला अडसूळ यांनी राणा यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता.

नवनीत राणा यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविली होती. पण, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा होता. तसेच अमरावतीची जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आली होती. मात्र, नवनीत राणा यांनी आजोबांपासून सर्वांचे जात प्रमाणपत्र खोटे बनविले असल्याचा आरोप करत आनंदराव अडसूळांनी न्यायालयात धाव घेतली होती. शेवटी आता हे प्रकरण निकाली काढण्यात आले असून हा संविधानिक घोटाळा असल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. तसंच त्यांना २ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे आता नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे.

अमरावतीमध्ये पोटनिवडणूक होणार? -

न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द ठरविल्यामुळे त्यांचा खासदारकी धोक्यात आली आहे. पण, नवनीत राणा यांच्यासमोर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे. राणा सर्वोच्च न्यायलयात दाद मागतात का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे जर राणांची खासदारकी गेली, तर अमरावतीमध्ये पोटनिवडणूक लागण्याची देखील शक्यता आहे.

राणा दाम्पत्य आणि शिवसेना -

आनंदराव अडसुळ हे शिवसेनेचे नेते आहेत. या दोघांमध्ये २०१३ पासूनच वाद होता. त्यानंतर अडसूळांनी राणा यांचे जातप्रमाणपत्र खोटे असल्याचा आरोप केला त्यावेळी हा वाद टोकाला पोहोचला. तेव्हापासून राणा दाम्पत्य हे शिवसेनेविरोधात तलवार उपसूनच असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()