Eknath Shinde : कल्याणनंतर सोलापुरात धुसफूस; भाजप काम करु देत नसल्याचा शिंदे गटाचा आरोप

Devendra Fadnavis and Eknath Shinde
Devendra Fadnavis and Eknath ShindeEsakal
Updated on

सोलापूरः कल्याणमध्ये भाजप विरुद्ध शिंदे गट असं युद्ध पेटलेलं असतांना आता सोलापूर जिल्ह्यातही तू-तू, मैं-मैं सुरु झाली आहे. भाजप काम करु देत नसल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आलेला आहे.

कल्याणमध्ये नेमकं काय झालं?

कल्याण लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार भाजप ठरवणार असल्याचं विधान एका भाजपच्या महिलेनं केलं होतं. यावर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, मी सोशल मीडियावर स्टेटमेंट्स ऐकली आहेत. मला वाटतं वरिष्ठ पातळीवर उमेदवार कोण असेल हे ठरेल. जो योग्य असेल त्याला उमेदवारी देतील.

Devendra Fadnavis and Eknath Shinde
Wrestlers Protest: फक्त ब्रिजभुषणच नव्हे इतरही अनेकजण...; फिजोथेरपिस्टच्या नव्या आरोपांनी खळबळ

'मला कुठलाही स्वार्थ नाही, मला कोणी सांगितलं की कल्याण लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा द्या तर मी देईन आणि पक्षाचं आणि युतीचं काम करायला मी तयार आहे. दुसरा कोणताही उमेदवार इथं असेल तर त्याला निवडून देण्यासाठी मी काम करेन. आमचा उद्देश एकच आहे २०२४ मध्ये पुन्हा एकदा मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत, यात कुठलाही स्वार्थ नाही' असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं होतं.

कल्याण वादानंतर आता सोलापुरातील वाद समोर आला आहे. सोलापुरातील शिंदे गटाचे संजय कोकटे यांनी भाजपवर आरोप केले आहेत. त्यांचा व्हीडिओदेखील समोर आलेला आहे. त्यात कोकाटे म्हणतात, एकनाथ शिंदेंमुळे आपण सत्तेत आलेलो आहोत. सोलापूर जिल्ह्यात आपल्याला भाजपचा खूप त्रास सहन करावा लागतो.

Devendra Fadnavis and Eknath Shinde
Sharad Pawar : '...मग क्रांती झाल्यावरच बघू' नार्वेकरांच्या विधानावर शरद पवार थेट बोलले

पालकमंत्री वेळ देत नाहीत. संजय गांधी निराधार समित्या झालेल्या नाहीत. फक्त भाजपचंच काम करायचं, असा जणू अलिखित नियम आहे. असा थेट आरोप संजय कोकाटेंनी केला आहे. 'साम टीव्ही' ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.