Mumbai Ice Cream Case: 'आईस्क्रीम'मधील बोटाचा DNA झाला मॅच; फॉर्च्यून डेअरीचा 'तो' असिस्टंट ऑपरेटर कोण?

Ice Cream Case : ज्या आईस्क्रीमच्या फॅक्टरीत हे आईस्क्रीम तयार करण्यात आलं होतं त्या फॅक्टरीचं नाव फॉर्च्यून डेअरी असं आहे. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे डीएनए रिपोर्ट पोलिसांनी लॅबला पाठवले होते.
Ice Cream Case
Ice Cream Caseesakal
Updated on

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका डॉक्टरला आईस्क्रीममध्ये मानवी हाताचं बोट आढळून आल्यानं खळबळ उडाली होती. यानंतर या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला होता. या मानवी बोटाची डीएनए चाचणी करण्यात आली.

ज्या आईस्क्रीमच्या फॅक्टरीत हे आईस्क्रीम तयार करण्यात आलं होतं त्या फॅक्टरीचं नाव फॉर्च्यून डेअरी असं आहे. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे डीएनए रिपोर्ट पोलिसांनी लॅबला पाठवले होते.

गुरुवारी पोलिसांना डीएनए रिपोर्ट प्राप्त झाले असून फॉर्च्यून डेअरीमध्ये काम करणारा असिस्टंट ऑपरेटर ओमकार पोटे याचा डीएनए आणि आईस्क्रीममधील बोटाचा डीएनए मॅच झाला आहे. या कामगाराने डेअरीकडे अपघाताबद्दल सांगितलं होतं, पण कंपनीने काहीही कार्यवाही केली नसल्याची माहिती आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.

Ice Cream Case
Arundhati Roy : अरुंधती रॉय यांना ब्रिटनचा ‘पेन पिंटर' पुरस्कार जाहीर; कोणाला अन् का मिळतो हा पुरस्कार? वाचा

नेमकं काय घडलं होतं?

मुंबईतील मालाड इथं राहणाऱ्या एका डॉक्टरनं ज्यांचं नाव ब्रेन्डन फेरारो असं आहे, यांनी तीन आईस्क्रीम कोन ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून मागवले होते. त्याचवेळी आईस्कीम खात असताना फेरारो यांना बाईट करताना काहीतरी वेगळंच खात असल्याची जाणीव झाली. त्यांना वाटलं कदाचित आईस्क्रीममध्ये मोठा काजू किंवा बदाम असावा. त्यानंतर त्यांनी कोनमधील हे आईस्क्रीम बोटानं बाजूला केलं तर त्यांना धक्काच बसला. कारण त्यावर त्यांना नख दिसलं! ही माझ्यासाठी थरारक घटना होती, असं या डॉक्टरनं सांगितलं.

Ice Cream Case
Monsoon Session 2024 : लाडकी बहीण योजना! महिन्याला मिळणार दीड हजार रुपये? मध्य प्रदेशमध्ये गेम चेंजर ठरलेली योजना महाराष्ट्रात? काय आहेत निकष?

दरम्यान, या घटनेची चर्चा सुरु झाल्यानंतर हे आईस्क्रीम बनवणाऱ्या Yummo कंपनीनं स्पष्टीकरण दिलं की या आईस्क्रीमची निर्मिती थर्ट पार्टी कंपनीकडून केली जाते. त्यामुळं आम्ही या थर्ड पार्टी कंपनीचं काम थांबवलं आहे. या प्रकरणी आता पोलिसांना मुंबईतल्या फॉर्च्यून डेअरीमध्ये काम करणाऱ्या असिस्टंट ऑपरेटरचं डीएनए बोटाच्या तुकड्याशी मॅच झाल्याचा अहवाल मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.