दारुचे व्यसन अन् ED मागे लागलेल्या नेत्याला निवडून देऊ नका; अण्णा हजारेंचा केजरीवालांवर बोचरा वार

Anna Hazare vs arvind Kejriwal: अण्णांनी कथित दिल्ली घोटाळाप्रकरणी नुकतेच जामिनावर बाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
Anna Hazare says on arvind Kejriwal
Anna Hazare says on arvind Kejriwal
Updated on

मुंबई- देशात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अहमदनगर मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अण्णांनी कथित दिल्ली घोटाळाप्रकरणी नुकतेच जामिनावर बाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. केजरीवाल यांना गेल्या काही दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली होती.

मतदानानंतर अण्णांनी माध्यमाशी संवाद साधला. अण्णा म्हणाले की, “नागरिकांना आपला चांगला उमेदवार निवडण्याची संधी आहे. त्यांनी चुकीच्या नेत्यांकडे आपल्या देशाची चावी देऊ नये. तसेच कोणत्याही भ्रष्टाचारात सामील नसणाऱ्या आणि स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या नेत्यांची निवड नागरिकांनी करावी''

Anna Hazare says on arvind Kejriwal
Pune Lok Sabha 2024: हॅट्‌ट्रिक होणार की चमत्कार? धंगेकर 'भाऊ' की मोहोळ 'अण्णा', पुण्यात कोण करणार हवा

दारुचे व्यसन असणारे नेतेच असे घोटाळे करत असल्याचा आरोप अण्णांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर केला आहे. त्याचबरोबर अशा नेत्यांना कोणीही मतदान करु नये असे अण्णा हजारे म्हणालेत. याआधीही अण्णा हजारेंनी अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेकवेळा टिका केली आहे.

येत्या काही दिवसातच दिल्लीचे लोकसभा मतदान होणार असल्याने अण्णांनी केलेल्या टीकेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. पहिल्याच पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवालांनी आम आदमी पक्षाच्या प्रचारासाठी कठोर परिश्रम घेणार असल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर अण्णांनी हे वक्तव्य केलं आहे.

Anna Hazare says on arvind Kejriwal
Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत शेअर बाजारात गोंधळ; 2014 आणि 2019मध्ये कशी होती मार्केटची स्थिती?

भारताच्या संविधानाबद्दल काय म्हणाले अण्णा?

यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी संविधानावर होत असलेल्या टीकेवर भाष्य केलं. ते म्हणाले की. 'भारताचं संविधान म्हणजे जगातील सर्वात सुंदर संविधान आहे. ते बदलण्याचा प्रयत्न कोणत्याही पक्षाने करु नये.'

लोकसभा निवडणुकांसाठी दिल्लीमध्ये येत्या २५ तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे आता देशाच्या राजधानीत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

(स्टोरीः मनोज साळवे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.