Do not use ncp chief Sharad Pawar photo
मुंबई- शरद पवार यांचा फोटो न वापरण्याच्या सूचना अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी फोटो वापरल्यास कोर्टात जाऊ असा इशारा दिला होता. त्यामुळे अजित पवार गट सतर्क झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवार यांचा फोटो फ्लेक्सवर किंवा इतरत्र कोठे न वापरण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.
डॉ.योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात बुधवारी प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत क्षीरसागरांचा प्रवेश झाला.क्षिरसागर यांच्या कार्यक्रमावेळी फ्लेक्सवर शरद पवारांचा फोटो नसल्यानं माध्यमांमध्ये चर्चा रंगल्या होत्या.त्यानंतर सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार शरद पवारांचा फोटो फ्लेक्सवर न वापरण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना मिळाल्याचं कळतंय. बीडमधील सभेच्या टिझरमध्ये देखील शरद पवारांचा फोटो वापरण टाळण्यात आलं होतं.
डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पक्षप्रवेशामुळे बीडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणखी बळ मिळणार आहे. पक्षात प्रवेश करताच योगेश क्षीरसागरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा शब्द देत अजित पवार यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडसाठी नवे संकेतही दिले. मी आणि माझ्या समर्थकांनी विश्वास टाकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला, असं क्षीरसागर म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट तयार झाले आहेत. अजित पवार गट भाजप आणि शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवार गट वेगळा झाला असला तरी अजूनही शरद पवारांचा फोटो त्यांच्या फ्लेक्सवर दिसत होता. शरद पवार यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आता त्यांचे फोटो फ्लेक्सवर न दिसण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.