मराठी विनोदपीठाचे आद्य कुलगुरु असं कोणाला म्हणतात माहितीय?

मराठी विनोदपीठाचे आद्य कुलगुरु' अशी पदवी प्र.के अत्रे यांनी या महान व्यक्तीस दिली होती.
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
श्रीपाद कृष्ण कोल्हटकरsakal
Updated on

'मराठी विनोदपीठाचे आद्य कुलगुरु' अशी पदवी प्र.के अत्रे यांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना दिली होती. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म विदर्भातील अकोला येथे २९ जून १८७१ रोजी झाला होता. कोल्हटकरांचे माध्यमिक शिक्षण हे अकोल्यातच पूर्ण झाले होते. पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आणि शिक्षण घेत असतांनाच अचानक त्यांच्यातील समीक्षक जागा झाला. नाटकाचं समीक्षण करता करता त्यांनी विनोदी लेखणाला सुरुवात केली आणि एक नवा अध्याय सुरु झाला.

१८९२ ते १९०२ या काळात कोल्हटकरांनी ११ समीक्षात्मक लेख लिहिले. दरम्यानच्या काळात वकिलीची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते १८९८ साली ते पुन्हा विदर्भात वकिलीसाठी दाखल झाले. याच ठिकाणी कोल्हटकरांच्या स्वतंत्र विनोदी लेखनाला बहर आला.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक

१९०२ साली श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी (shripad krushna kolhatkar) "साक्षीदार"हा पहिला विनोदी लेख लिहला आणि तो विविधज्ञानविस्तार च्या अंकात छापून देखील आला.

पुढे मग त्यांनी विनोदी लेखन करण्यासाठी सुदामा हा मानसपुत्र निवडला. कोल्हटकरांनी सुदामा, बंडुनाना आणि पांडुतात्या अशा तीन पात्रांचा समावेश असणाऱ्या विनोदी लेखनातून धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनातील विसंगतींवर बोट ठेवले. त्यांच्या अशा १८ विनोदी लेखांचा ‘सुदाम्याचे पोहे अर्थात अठरा धान्यांचे कडबोळे’ हा संग्रह १९१० साली प्रसिद्ध झाला. त्यात पुढे आणखी १४ लेखांची भर घालून १९२३ साली ‘सुदाम्याचे पोहे अर्थात साहित्यबत्तिशी’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
“काय झाडी… काय डोंगर…सेनेने मुखपत्रातून बंडखोरांना चांगलेच खडेबोल सुनावले

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं' सुखामालिका' हे पहिलं नाटक होतं. त्या काळी किर्लोस्कर नाटक मंडळी ही महत्त्वाची नाट्यसंस्था होती. या संस्थेसाठी नाटके लिहिणारे कोल्हटकर हे त्या काळातील प्रमुख नाटककार होते. पुढे त्यांनी रहस्यपूर्ण, गुंतागुंतीचे कथानक साकारताना शिक्षण, मद्यपान निषेध, प्रीती विवाह, हे सुधारणविषयक तसेच पुनर्विवाह, केशवपन, भ्रूणहत्या, हे सामाजिक विषय नाटकातून मांडले.

पुढे १९२७ 'बहु असोत सुंदर संपन्न की महा,प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा' हे महाराष्ट्राचे सुंदर वर्णन करणारे गीत लिहून श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाराष्ट्रच्या काव्यदरबारात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
वाघाची वाट काटेरी

एक मे १९६० रोजी जेव्हा महाराष्ट्र राज्याचा जन्म झाला, तेव्हा मुंबईत शिवतीर्थावरच्या सोहळ्यात'बहु असोत सुंदर संपन्न की महा,प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा' हे गीत संगीतकार स्नेहल भाटकर व गायिका ज्योत्स्ना भोळे यांनी हे गीत गायले होते.तो क्षण महाराष्ट्रातील लोकांना सदैव आठवणीत राहिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.