पावसाळ्यात लाईट का जाते तुम्हाला माहितीयं का? जाणून घ्या, पावसाळ्यातील विजेचा लपंडावाची कारणे

पावसाळा किंवा वादळाच्या काळात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामागे ग्राहकांची सुरक्षितता हेच प्रमुख कारण असल्याची माहिती ‘महावितरण’चे कार्यकारी अभियंता आशिष मेहता यांनी दिली.
mahavitaran
mahavitaranesakal
Updated on

सोलापूर : सोलापूर शहर-जिल्ह्यात ‘महावितरण’चे जवळपास आठ लाखांहून अधिक वीज ग्राहक आहेत. त्यांच्यासाठी दररोज एक हजार मेगावॉटपर्यंत वीज लागते. शेतकऱ्यांना दररोज आठ तास वीज मिळते. इतर ग्राहकांना २४ तास वीजपुरवठा होतो. पण, पावसाळा किंवा वादळाच्या काळात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामागे ग्राहकांची सुरक्षितता हेच प्रमुख कारण असल्याची माहिती ‘महावितरण’चे कार्यकारी अभियंता आशिष मेहता यांनी दिली.

सोलापूर शहर-जिल्ह्यातील ग्राहकांना वीजपुरवठा विद्युत तारांमधूनच होतो. त्यासाठी जागोजागी वीजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर बसवले आहेत. रस्त्यालगत असलेल्या खांबाजवळ झाडे आहेत. पाऊस पडताना अनेकदा झाडाच्या फांद्या वादळामुळे तारेला चिकटतात. दुसरीकडे पावसाच्या पाण्यामुळे ट्रान्सफॉर्मर जळण्याची शक्यता असते. त्यामुळे अचानक वीज जाण्यामुळे अनेकांच्या घरातील महागडी उपकरणे जळू शकतात.

दुसरीकडे वीजेचा शॉर्टसर्किट झाल्याने अनेकांना पावसात धोका होवू शकतो. त्यामुळे खबरदारी व सुरक्षिततेला प्राधान्य देऊन वीज खंडित केली जाते. काही ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती होईपर्यंत वीज पुरवठा खंडित ठेवावा लागतो. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीत ग्राहकांना त्रास होतो. पण, ग्राहकांना त्रास व्हावा, जाणीवपूर्वक वीजपुरवठा खंडित कधीच केला जात नाही. दरम्यान, पावसाळ्यात शेतकऱ्यांनी कृषीपंपाची वीज सुरु करताना खबरदारी घ्यावी, असेही आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे.

अशी आहेत प्रमुख कारणे...

  • १) इन्सुलेटरमध्ये पाणी जाऊन ते खराब होऊ शकतात.

  • २) खांबाजवळील झाडांचा तारांना होतो स्पर्श.

  • ३) झाडांच्या फांद्या विजेच्या तारांना चिकटतात.

  • ४) कधी कधी लाईटच्या तारा एकमेकाला चिकटून जाळ होऊ शकतो.

  • ५) ट्रान्सफॉर्मरमध्ये पाणी जाऊन ते खराब होते; कधीतरी फेज डाउन होते.

  • ६) बहुतेकवेळा लोकांच्या सुरक्षिततेसाठी बंद केली जाते. लाइट घोटाळ्यामुळे जळू शकतात उपकरणे.

ट्रान्स्फॉर्मरवर ‘लाईटनिंग ॲरेस्ट’ यंत्र

वीजेचा पुरवठा करणाऱ्या प्रत्येक ट्रान्स्फॉर्मरवर टोकेरी आकाराचे वीज निवारक यंत्र (लाईटनिंग ॲरेस्ट) बसवलेले असते. वीज पडल्यानंतर ते यंत्र स्वत: फुटते, पण ते ट्रान्स्फॉर्मरला धोका होऊ देत नाही. चारचाकी गाड्यांमध्ये जशी एअर बॅग असते, तसेच ते यंत्र काम करते. सोलापूर शहरात दोन हजार १८६ ट्रान्स्फॅार्मर असून त्या प्रत्येक ट्रान्स्फॉर्मरवर ते यंत्र बसविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.