सोलापूर : मधुमेह हा एक जुनाट आजार असून जो स्वादुपिंड इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा जेव्हा शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करत नाही. इन्सुलिन हे स्वादुपिंडाने बनवलेला हार्मोन असून खाल्लेल्या अन्नातील ग्लुकोज रक्तप्रवाहातून शरीराच्या पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतो. बदललेली जीवनशैली आणि आहारामुळे मधुमेह वाढत आहे. मात्र, त्याचे योग्यवेळी व्यवस्थापन न केल्यास धोकादायक ठरू शकतो. योग्य आयुर्वेदिक उपचार, सकस आहार आणि शारीरिक व्यायामातून मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते.
आवळा, जांभूळसोबतच अंजीर, देशी केळी, बेलफळ, डाळिंब, कोकम यांचा देखील आहारात समावेश केल्यास मधुमेह झालेल्यांसाठी फायदेशीर ठरते. आपल्या प्रदेशात तयार होणाऱ्या तेलाचा वापर करावा. गाईचे तूप गाईचे दूध यांचा आहारात समावेश करावा. तहान लागल्यावर उकळून गार केलेले शक्यतो सुंठ, वाळा अथवा नागरमोथा घातलेले पाणी प्यावे. या सर्व गोष्टी अगदी सोप्या असतात. यांचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात केल्यास मधुमेह सारखा मोठा आजार टाळता येतो.
मधुमेहाच्या रुग्णांना लठ्ठपणा आणि हृदयविकार यांसारख्या आजारांचाही धोका जास्त असतो. मधुमेहाच्या रुग्णांनी आयुर्वेदिक उपचार तसेच आहाराचे नियम, या बाबी काटेकोर सांभाळाव्यात. ज्यामुळे त्यांची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते, असे पदार्थ जे रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या कमी करू शकतात, असे आयुर्वेद तज्ज्ञांचे मत आहे.
मधुमेह नियंत्रित करण्यासाठी...
- आहारात जुना तांदुळ असावा, जुना नसल्यास तो भाजून घ्यावा व त्यानंतर त्यात सुंठ, ओवा, मेथी यांपैकी एक तुकडा टाकून भात बनवावा. कुकरमध्ये शिजवलेला भात शक्यतो टाळावा.
- चपाती अथवा पोळीऐवजी फुलके खावे. आहारात शेवगा, मेथी, मुळा, कोबी, पालक, तांदूळजा, ब्रोकोली अशा भाज्यांचा समावेश करावा. ग्रेव्हीच्या भाज्या, मेथी मटर, मलाई, व्हेज कोफ्ता, अशा भाज्या टाळाव्यात. कारले, शेवगा, तोडले, पडवळ, कोहळा, दुधी भोपळ्याचाही आहारात समावेश करावा.
- मधुमेहात ‘व्हिटॅमिन सी’ गुणधर्मांनी समृद्ध आवळा स्वादुपिंडाच्या उपचारांसाठी सर्वोत्तम उपाय असून त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
- आवळा कच्चा, मुरंबा, लोणचे किंवा पावडर खाऊ शकतो. मधुमेहात जांभळाच्या बियांचे फायदे जामुनच्या बिया मधुमेहावरील सर्वात प्रभावी उपायांपैकी एक आहेत. याच्या बियांमध्ये जांबोलिन आणि जॅम्बोसिन संयुगे जास्त असतात.
मधुमेह नियंत्रणात येतो, पण...
मधुमेही रुग्णांना रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवायचे असल्यास योग्य आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. तसेच आयुर्वेदिक उपचार आणि आहाराचे नियम काटेकोर पाळल्यास आधुनिक औषधांसोबतच आयुर्वेदिक औषधे घेऊन आधुनिक औषधांचे डोस कमी करता येतात आणि मधुमेहावर पूर्ण नियंत्रण मिळवता येते.
- डॉ. संतोष स्वामी, मधुमेह व थायरॉईड विकार तज्ज्ञ, शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रूग्णालय, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.