सोलापुरात रूग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरला मारहाण! सर्वोपचार रूग्णालयाचे अधीष्ठाता डॉ. ठाकूर यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय; रूग्णासोबत आता दोघांनाच प्रवेश

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयातील रुग्णाला पाहायला येणाऱ्या केवळ दोन नातेवाइकांनाच आता रुग्णालयात सोडले जाणार आहे. त्यासाठी त्यांना तेथील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातून पास घेणे बंधनकारक असणार आहे.
solapur hospital
solapur hospitalsakal
Updated on

सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयातील रुग्णाला पाहायला येणाऱ्या केवळ दोन नातेवाइकांनाच आता रुग्णालयात सोडले जाणार आहे. त्यासाठी त्यांना तेथील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातून पास घेणे बंधनकारक असणार आहे.

सोलापूर शहरातील गुरूनानक चौकात २०० खाटांचे जिल्हा रूग्णालय सुरू झाले आहे, पण अद्याप त्याठिकाणी पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे अजूनही श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातच मोठ्या प्रमाणावर रूग्ण उपचारासाठी दाखल होतात ही वस्तुस्थिती आहे. अनेक रूग्ण शेवटच्या क्षणी रूग्णालयात दाखल केले जातात आणि त्यातील काहींचा मृत्यू होतो. सोमवारी (ता. १९) अक्कलकोट तालुक्यातील एका १२ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यावेळी तिच्या नातेवाइकांनी रूग्णालयातील डॉक्टरला मारहाण केली. या प्रकरणी सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिस उपनिरीक्षक नवनाथ साखरे तपास करीत आहेत. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घेत सर्वोपचार रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी रुग्णासोबत आता केवळ दोन नातेवाइकांनाच सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पास असेल तरच प्रवेश

रूग्णाला वाचविण्याचा प्रयत्न डॉक्टर करत असतात, कोणत्याही डॉक्टरला रुग्णाचा मृत्यू व्हावा असे वाटत नसते. त्यामुळे रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरला मारहाण करणे हे दुर्दैवी आहे. रुग्णालयात विनाकारण गर्दी होवू नये म्हणून आता रुग्णासोबतचा एक नातेवाईक व बाहेरून औषध-गोळ्या आणायला एक नातेवाईक किंवा रुग्णाला पाहायला येणाऱ्या एका नातेवाईकाला पास दिला जाणार आहे. पास असलेल्यांनाच आता रुग्णाला पाहायला सोडले जाईल.

- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय, सोलापूर

वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात पासची सोय

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दररोज १३० ते १५० रुग्ण दाखल होतात. रूग्णालयातील खाटा नेहमीच पूर्ण क्षमतेने भरलेल्या असतात. त्या रुग्णांना पाहायला येणाऱ्या नातेवाइकांचीही मोठी गर्दी सर्वोपचार रूग्णालयात नेहमीच दिसते. रूग्णालयातील गर्दी टाळणे व डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना उपचारात कोणताही व्यत्यय नको म्हणून रुग्णाला पाहायला येणाऱ्या दोन नातेवाइकांनाच आता रूग्णालयात सोडले जाणार आहे. त्यासाठी त्यांना तेथील वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयातून पास घेणे बंधनकारक असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.