अचलपूर (जि. अमरावती) : राज्याच्या भरारी पथकातील (Doctor flying squad) मानसेवी वैद्यकीय अधिकारी (Health Officers) स्थायी (Permanent Position) होणार म्हणून कमी मानधनात दिवसरात्र अतिदुर्गम भागात सेवा देत आहेत. मात्र त्यांच्या मागणीला अद्यापही यश मिळाले नाही. मानधनवाढीचा महत्त्वपूर्ण निर्णय १६ सप्टेंबर रोजी शासनाने घेतला होता. मात्र अद्यापही हा निर्णय शासनदरबारी धूळखात पडून आहे. त्यामुळे आता डॉक्टरांनी आश्वासन नको, स्थायी करण्याचा निर्णय घ्या, अन्यथा सामूहिक आत्महत्येची परवानगी द्या, अशी मागणी मुख्यमत्र्यांकडे (CM Uddhav Thackeray) केली आहे. (Doctors in flying squad seeking permission to end life to CM)
राज्यातील संपूर्ण आदिवासी जिल्ह्यात नवसंजीवनी योजनेअंतर्गत २८२ डॉक्टर कार्यरत आहेत. ज्यामध्ये २२ डॉक्टर मेळघाटातील आहेत. राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्याच्या आदिवासी भागात नवसंजीवनी योजनेंतर्गत मानसेवी वैद्यकीय अधिकारी कार्यक्षेत्रात जाऊन सेवा देतात. सोबतच आश्रमशाळेत तपासणीचे काम करतात.
विशेष म्हणजे, हे मानसेवी वैद्यकीय अधिकारी अतिदुर्गम आणि संवेदनशील भागातील जवळपास आठ ते दहा गावांना सेवा देतात. ते बाह्य रुग्ण तपासणी, गरोदर माता, स्तनदा माता व कुपोषित बालकांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करतात. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रांना इतर राष्ट्रीय कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणीसाठी मदत करीत असतात.
कोविडच्या संकटात आरोग्यसेवेसाठी डॉक्टर बहुमोल योगदान देत आहेत. असे असतानाही त्यांच्या मानधनवाढीचा निर्णय लागू करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे आता राज्यातील डॉक्टरांनी आश्वासन नको, स्थायीचा निर्णय घ्या, अन्यथा सामूहिक आत्महत्येची परवानगी द्या, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
(Doctors in flying squad seeking permission to end life to CM)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.