कुख्यात गुंड सुरेश पुजारी प्रकरण आता खंडणी विरोधी पथकाकडे

न्यायालयाने सुनावणीदरम्यान सुरेश पुजारी याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
 crime
crimeesakal
Updated on
Summary

न्यायालयाने सुनावणीदरम्यान सुरेश पुजारी याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुंबई - कुख्यात गुंड सुरेश पुजारी (Suresh Pujari) याला फिलीपाईन्समधून (Philippines) भारतात (India) आणण्यात आलं. अटक (Police arrested) करत दिल्ली पोलिसांनी त्याला एटीएसच्या ताब्यात दिलं. त्यानंतर एटीएसने त्याला ठाणे न्यायालयात हजर केलं. यानंतर न्यायालयाने सुनावणीदरम्यान सुरेश पुजारी याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आता हे प्रकरण खंडणी विरोधी पथकाकडे गेले आहे. गुंड सुरेश पुजारीवर वाकोला पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 crime
'आधी रजिस्टर, नंतर ख्रिश्चन पद्धतीने लग्न का?'

दरम्यान, दिल्ली (Delhi) पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीप्रमाणे, मुंबई आणि कर्नाटकामध्ये खंडणीद्वारे वसुली करण्याची अनेक प्रकरणे पुजारीच्या नावावर आहेत. सुरेश पुजारीच्या नावावर मुंबईव्यतिरिक्त (Mumbai) ठाणे, कल्याण, उल्हासनगर आणि डोंबिवलीमध्येही याप्रकारचे गुन्हे दाखल असून त्याला फिलीपाईन्समधून (Philippines) अटक करण्यात आली आहे. 22 मार्च 2021 रोजी एका कंपनीच्या संचालकाला फोन करून पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती, याप्रकरणी खंडणी (Anti-Extortion Cell) विरोधी पथकाने त्याच्यावर कारवाई केली होती.

 crime
Banda Political News: राणेंनी समजूत घालताच बांदेकरांनी घेतला अर्ज मागे

सुरेश पुजारीची खंडणी मागणी

सुरेश पुजारी याच्यावर कल्याणमधील महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या अंतर्गत धमकी आणि खंडणीचा गुन्हा दाखल होता. १९ जुलै २०२१ रोजी सुरेश पुजारी याने के के वाईन्सचे मालक रोहित जेठाणी आणि त्यांचा भावाला धमकी देत ५० लाखांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी जेठाणी कुटुंबीयांनी ठाणे एटीएसमध्ये धाव घेत तक्रार केली होती. खंडणी आणि धमकावणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे सुरेश पुजारी याच्यावर याआधी देखील दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.