पुणे ः दक्षिण आफ्रिकेत २४ नोव्हेंबरला आढळलेल्या ‘ओमिक्रॉन’ नावाच्या कोरोना व्हेरिएंट संदर्भात जगभरात भीतीदायक वातावरण आहे. अनेक देशांनी आफ्रिकेतून येणारी हवाई वाहतूकही बंद केली आहे. अफ्रिकेतील हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून फार दिवस झालेले नाहीत. त्यामुळे त्याचा प्रसार आणि तीव्रते संदर्भात शास्रीय अंदाज आहेत. प्रत्यक्ष पुरावे अजून नाहीत. त्यामुळे नागरिकांनी नव्या व्हेरिएंटबद्दल अनावश्यक भीती बाळगू नये. मात्र आवश्यक ती काळजी आवाहन शास्रज्ञांनी केले आहे.
सकाळने यासंबंधी सुक्ष्मजिवशास्रातील वरिष्ठ शास्रज्ञांशी संवाद साधला. ते म्हणाले,‘‘विषाणू म्हटल्यावर त्यात म्युटेशन होणारच. आफ्रिकेतील या नव्या व्हेरिएंटसाठी शास्रीय आधार आहे. मात्र आता सध्या सर्व शक्यताच वर्तविण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंटचा प्रसाराचा दर आणि त्याही पेक्षा त्यापासून होणाऱ्या आजाराची तीव्रताही पाहणे गरजेचे आहे. लोकांनी काळजी घ्यावी पण अतिरिक्त भीती बाळगू नये.’’ सर्वात प्रथम माहिती मिळालेला नव्या B.1.1.529 व्हेरिएंटचा विषाणू हा ९ नोव्हेंबरला गोळा करण्यात आलेल्या रुग्णाच्या नमुन्यात आढळला होता. आफ्रिकेतील व्हेरिएंट सापडून थोडेच दिवस झाले आहे. त्यामुळे शास्रीय माहितीच्या आधारे त्याची तीव्रता जाणून घेण्यासाठी अजून वेळ लागेल.
नव्या व्हेरिएंटबद्दल
प्रसाराचा दर आणि आजाराच्या तिव्रतेबद्दल शास्रीय विश्लेषण नाही
मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा झाल्यानंतर शास्रीय विश्र्लेषणातून आडाखे बांधता येतील
भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले आहे
लोकांमध्ये सिरोपॉझीटीवीटी मोठ्या प्रमाणार आहे
प्रत्येक राज्यात कोरोना विषाणूतील व्हेरिएंट तपासण्याची सुविधा आहे
व्हेरिएंट शोधण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण ः
१) प्रहरी सर्वेक्षण ः राज्यातील पाच प्रयोगशाळा आणि पाच रुग्णालयांची निवड प्रहरी केंद्र म्हणून करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रातून दर पंधरवड्याला १५ कोरोना बाधितांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था (एनसीसीएस) यांना पाठविले जातात.
२) सर्वोच्च विज्ञान संस्थेचा सहभाग ः वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) सहकार्याने विविध जीवशास्त्राच्या प्रयोगशाळांत कोरोना बाधितांचे नमुने तपासले जातात. याद्वारे जिल्ह्यातून १०० नमुन्यांची तपासणी केली जाते.
"आफ्रिकेतील नव्या व्हेरिएंटचे अजुनही जणुकीय क्रमनिर्धारण झालेले नाहीत. ते झाल्यावरच परिणामकारक औषधे आणि लसी वापरता येतील. या नव्या व्हेरिएंटबद्दल आत्ताच घाबरून न जाता. योग्य ती काळजी घेतली पाहीजे."
- डॉ. अरविंद नातू, ज्येष्ठ शास्रज्ञ, आयसर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.