मला चॅलेंज करु नका, अन्यथा मंडल आयोग...; मनोज जरांगेंचे भुजबळांना प्रत्युत्तर

Manoj Jarang to chhagan Bhujbal obc Mandal Commission: मंडल आयोगाला चॅलेंज करायचं असेल करा असं आव्हान मंत्री छगन भुजबळ यांनी केलं होतं. यावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
 Manoj Jarang to chhagan Bhujbal obc Mandal Commission
Manoj Jarang to chhagan Bhujbal obc Mandal Commission
Updated on

मुंबई- तीन कोटी मराठा मुंबईत येतील असं म्हणाला होता, त्याचं काय झालं? मंडल आयोगाला चॅलेंज करायचं असेल करा असं आव्हान मंत्री छगन भुजबळ यांनी केलं होतं. यावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मराठ्यांची संख्या मोजण्यासाठी त्यांना पुलावर थांबायला सांगितलं होतं. ६४ किलोमीटरची रांग मराठ्यांची होती. एकूण २७ टक्के मराठा आले होते, असं ते म्हणाले.(Dont challenge me will challenge the Mandal Commission soon said Manoj Jarang to chhagan Bhujbal)

सामान्य ओबीसींना माझी विनंती आहे की त्यांनी छगन भुजबळ यांना समजावून सांगावं. मला चॅलेंज देऊ नका? नाहीतर गोरगरीब ओबीसींचे नुकसान होईल. त्यांनी काड्या करण्याचं थांबवावं. अन्यथा मी शंभर टक्के मंडल आयोगाला चॅलेंज करेन. मंडय आयोगाचा अहवाल अद्याप स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना थांबायला सांगा अन्यथा मी कोर्टात चॅलेंज करणार आहे. मी लवकरच वकिलांची बैठक घेणार आहे, असं जरांगे म्हणाले.

 Manoj Jarang to chhagan Bhujbal obc Mandal Commission
Chhagan Bhujbal : ''हिंमत असेल तर मंडल आयोगाच्या विरोधात आवाज द्या'', छगन भुजबळांचं जरांगेंना थेट चॅलेंज

कोणीही कुठेही गेले तर काहीही फरक पडणार नाही. मराठ्यांना दिलेलं आरक्षण आता जाणार नाही. सरकारने फसवणूक केलेली नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठ्यांच्या बाजूने उभे राहतील. थोड्याच दिवसात आम्ही एकत्र येणार आहेत. वकिलांची टीम मी सज्ज करणार आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.

शिंदे सरकारने मराठा आरक्षणाबाबत अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे मराठा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात जुंपली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला चॅलेंज करु नका. अन्यथा ओबीसींमधील गोरगरिबांचे नुकसान होईल. पण, आम्हाला कुणाचं नुकसान करुन मोठं व्हायचं नाही, असं ते म्हणाले.

 Manoj Jarang to chhagan Bhujbal obc Mandal Commission
Chandigarh Mayor Election : महापौर निवडणुकीत भाजपचा ‘दे धक्का’; चंडीगडमध्ये मनोज सोनकर विजयी; ‘आप’चे कुलदीप कुमार पराभूत

मागच्या दारानं आरक्षण मिळाल्याचा आरोप करण्यात येत आहे. काहीही मागच्या दाराने झालं नाही. मराठ्यांपोटीच्या आकसामुळे छगन भुजबळ असं वक्तव्य करत आहेत. ते या मुद्द्यावरुन राजकारण करत आहेत. आम्ही गावागावात फिरणार आहोत. ओबीसींनी भुजबळांना समजावून सांगावं अशी विनंती करणार आहोत. तरी ते थांबलेच नाहीत तर आमचा नाईलाज होईल, असं जरांगे म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.