मास्क नसलेल्यांना दंड नकोच? राज्यातील जमावबंदी होणार शिथिल

ज्यावर सर्वसामान्यांची उपजिविका अवलंबून आहे, त्यावरील निर्बंध उठविण्यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यात खेळ, चित्रपटगृहे, विवाह अशा बाबींचा समावेश आहे. त्यासंबंधी फेब्रुवारीअखेरीस निर्णय होऊ शकतो, अशी माहिती विश्‍वसनिय सूत्रांनी दिली.
mask_10.jpg
mask_10.jpgEsakal
Updated on

सोलापूर : कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये कायम ठेवण्यात आलेली जमावबंदी (पाच अथवा पाचपेक्षा अधिक व्यक्‍तींना एकत्रित फिरण्यावरील बंधन) आता शिथिल होऊ शकते. ज्यावर सर्वसामान्यांची उपजिविका अवलंबून आहे, त्यावरील निर्बंध उठविण्यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यात खेळ, चित्रपटगृहे, विवाह अशा बाबींचा समावेश आहे. त्यासंबंधी फेब्रुवारीअखेरीस निर्णय होऊ शकतो, अशी माहिती विश्‍वसनिय सूत्रांनी दिली.

mask_10.jpg
बंद घरांवर चोरट्यांचा डोळा! सोलापुरात 48 दिवसांत 46 दुचाकींची चोरी

मार्च 2020 मध्ये कोरोनाचा राज्यात शिरकाव झाला आणि लॉकडाउनमुळे राज्याच्या अर्थकारणाची गती मंदावली. दुसरीकडे सात लाख 86 हजार व्यक्‍ती कोरोना बाधित आढळल्या. चिंतेची बाब म्हणजे एक लाख 43 हजार 560 व्यक्‍तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाच्या दोन्ही लाटांचा अनुभव खूपच भयावह असल्याने राज्य सरकारने निर्बंध शिथिल करताना सावध भूमिका घेतली. पण, कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेची तीव्रता फारशी जाणवली नाही. आता संसर्ग कमी होऊ लागला असून रुग्णालयात दाखल रुग्णही अत्यल्प असल्याने कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल बंद केले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर मोठ्या गर्दीच्या सार्वजनिक कार्यक्रमांशिवाय उर्वरित बाबींवरील निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. तसेच मास्क न घालता फिरणाऱ्यांना पाचशे रुपयांचा दंड आकारला जातोय. परंतु, दोनवेळच्या जेवणासाठी धडपडणाऱ्या हातावरील पोट असलेल्यांना तो दंड भरणे अशक्‍य आहे. त्यामुळे त्यांच्यावरील दंडात्मक कारवाई थांबविण्याचेही आदेश होऊ शकतात, असेही सूत्रांनी सांगितले. आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

mask_10.jpg
शिवसेना पदाधिकाऱ्यांना पक्षांतराची भीती! संपर्कप्रमुख नाहीत, मंत्र्यांकडून निधी मिळेना

कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने जानेवारीअखेरीस राज्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. आता पुढील टप्प्यातील निर्बंध शिथिल होतील. तत्पूर्वी, टास्क फोर्सचे मत विचारात घेतले जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अंतिम निर्णय होईल.
- संजय धारुरकर, संचालक, आपत्ती व्यवस्थापन

mask_10.jpg
परीक्षेसाठी एका वर्गात 25 विद्यार्थी! मुख्याध्यापकांना द्यावे लागणार हमीपत्र

असे होतील निर्बंध शिथिल...
- मैदानी खेळांना परवानगी, पण प्रेक्षक संख्या असावी मर्यादित
- चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरु राहतील, मास्कचे मात्र राहील बंधन
- जमावबंदीचे आदेश उठतील; पाच अथवा पाचपेक्षा अधिक व्यक्‍ती एकत्रित फिरु शकतात
- कोरोनाचा धोका पूर्णपणे टळेपर्यंत मास्कचे बंधन; विनामास्क व्यक्‍तींवरील दंडात्मक कारवाई थांबवावी
- कोरोनाची स्थिती पाहून सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंधदेखील होतील शिथिल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.