Rahul Gandhi: ...त्याला फ्लाईंग किस समजू नये; अजित पवार गटाच्या आमदाराकडून राहुल गांधींची बाजू

Rahul Gandhi and Ajit Pawar group
Rahul Gandhi and Ajit Pawar group
Updated on

मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणानंतर एका कृतीवरून देशाच्या राजकारणात गदारोळ सुरू आहे. राहुल गांधी यांनी दिलेल्या फ्लाईंग किसवरून प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आता अजित पवार गटाच्या नेत्याने राहुल गांधी यांची बाजू घेताना त्याला फ्लाईंग किस समजू नये, असं विधान केलं आहे.

Rahul Gandhi and Ajit Pawar group
Jailer Movie Marathi Actor : रजनीच्या जेलरमध्ये दोन 'मराठी' कलाकार, कोण आहेत ते?

अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान कऱणारे व्यक्ती संभाजी भिडे नसून मनोहर भिडे आहेत. तुषार गांधींनी तक्रार केलेली योग्यच आहे. त्यांच्याविरोधात महाराष्ट्रभर तक्रारी दाखल होत आहे. तसेच भिडेंविरोधात कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. हे भारतातील प्रत्येकाचे मत आहे. आम्ही सरकारमध्ये पाठपुरावा करतोय. मात्र कलम कठोर नसल्याने त्यांना अटक होवू शकली नाही, असंही मिटकरी म्हणाले.

Rahul Gandhi and Ajit Pawar group
Flying Kiss Controversy: देशाला वाचवायचे असेल तर राहुल गांधींचे लग्न गरजेचे; चित्रा वाघ यांचा सल्ला

फ्लाईंग किस मुद्दावर मिटकरी म्हणाले की, राहूल गांधी यांच्या हातातील कागदपत्र पडली होती, म्हणून त्यांनी बोटाने इशारा केला. त्याला कुणी फ्लाईंगकीस म्हणू नये. देशासमोर बेरोजगारी आणि महागाईसारखे फ्लाईंगकीस पेक्षाही महत्वाचे विषय आहे ज्यावर चर्चा झाली पाहिजे. बोट दाखवण्याला कुणी फ्लाईंगकीस म्हणत असेल तर हा नव्याने लागलेला शोध आहे. तसेच चित्रा ताईंनी विचार केला पाहिजे की, आपण कशासाठी आंदोलन केले पाहिजे. आम्ही जरी सत्तेत असलो तरी मत मांडण्याचा अधिकार आम्हाला आहे.

ऑन किशोर पाटील

कुठल्याही आमदारांनी अशाप्रकारची शिविगाळ करू नये. पत्रकारांनी देखील गरीमा राखली पाहिजे, असंही मिटकरी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.