‘आरटीई’ प्रवेशासाठी क्षमतेच्या दुप्पट अर्ज! मुदतवाढीची शक्यता आता कमीच; पालकांनी ‘या’ संकेतस्थळावर करावेत अर्ज

‘आरटीई’अंतर्गत नामांकित इंग्रजी माध्यमांच्या स्वयंअर्थसहाय्यिता शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्यास आता केवळ दोन दिवसांचीच मुदत शिल्लक आहे. क्षमतेच्या दुप्पट अर्ज आल्याने आता प्रवेश अर्जासाठी मुदतवाढीची शक्यता कमीच आहे.
solapur
DED admission sakal
Updated on

सोलापूर : ‘आरटीई’अंतर्गत नामांकित इंग्रजी माध्यमांच्या स्वयंअर्थसहाय्यिता शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्यास आता केवळ दोन दिवसांचीच मुदत शिल्लक आहे. सोलापूर शहर-जिल्ह्यातील ‘आरटीई’तून प्रवेशाच्या दोन हजार ४९६ जागा असून आतापर्यंत पाच हजार ९६१ विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. क्षमतेच्या दुप्पट अर्ज आल्याने आता प्रवेश अर्जासाठी मुदतवाढीची शक्यता कमीच आहे.

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात मोफत प्रवेश दिला जातो. ‘आरटीई’तून पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळाल्यानंतर पुढे इयत्ता आठवीपर्यंत त्या पालकांचे शैक्षणिक शुल्क शासनामार्फत भरले जाते. ‘आरटीई’ प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना तथा त्यांच्या पालकांना https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर अर्ज करता येतील.

सोलापूर जिल्ह्यातून जवळपास सहा हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यातील तीन हजार ९८३ पालकांनी आपल्या पाल्यास ‘आरटीई’तूनच प्रवेश घ्यायचा असल्याचे नमूद (कन्फर्म) केले आहे. दरम्यान, तिजोरीवरील दरवर्षीचा कोट्यवधींचा आर्थिक भार कमी व्हावा, कमी पटसंख्येच्या किंवा जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित मराठी शाळांनाही विद्यार्थी मिळावेत, पटसंख्येअभावी मराठी शाळा बंद पडू नयेत म्हणून ‘आरटीई’ प्रवेशाच्या नियमात शासनाने बदल केला. पण, तो फार काळ टिकला नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया राबवावी लागली.

‘आरटीई’चे तालुकानिहाय अर्ज

  • तालुका अर्ज

  • उत्तर सोलापूर ९९९

  • पंढरपूर ५७१

  • माढा ५४३

  • बार्शी ४७९

  • माळशिरस ३७८

  • सांगोला २४१

  • करमाळा २१२

  • द.सोलापूर २१२

  • मोहोळ १८८

  • अक्कलकोट १८४

  • मंगळवेढा ६५

  • सोलापूर शहर १३२६

  • इतर ५६३

  • एकूण ५,९६१

प्रवेश नियमात बदल करताच अर्जात वाढ

‘आरटीई’तून आता विद्यार्थ्यांना खासगी अनुदानित, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांचाच पहिल्यांदा प्राधान्यक्रम निवडता येईल आणि ज्या विद्यार्थ्यांच्या राहत्या घरापासून एक किमी अंतरावर खासगी अनुदानित किंवा शासकीय शाळा नाही, त्यांनाच इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थसहाय्यिता शाळेचा पर्याय निवडता येईल, असा बदल करण्यात आला होता. त्यावेळी पालकांकडून ‘आरटीई’ प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र, उच्च न्यायालयाने या बदलाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर शासनाने पुन्हा पूर्वीप्रमाणे प्रवेश होतील, असे आदेश काढले. त्यानंतर १३ दिवसांतच राज्यातून तीन लाखांहून अधिक अर्ज करण्यात आले आणि जवळपास दोन लाख पालकांनी निवडलेल्या शाळेतच प्रवेश मिळावा, असे पोर्टलवर नमूद पण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.