Satyajeet Tambe : सत्यजीत तांबेंच्याच पदवीबद्दल शंका; माहिती अधिकारात माहिती उघड

Satyajeet Tambe News
Satyajeet Tambe Newsesakal
Updated on

नाशिकः नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सत्यजीत तांबे यांच्याच पदवीबद्दल शंका उपस्थित करण्यात आलेली आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीमध्ये त्यांच्या पदवीसंदर्भातील माहितीमध्ये आक्षेप घेण्यात आलाय.

माहिती अधिकार कार्यकर्ते डॉ. अभिषेक हरिदास यांनी सत्यजित तांबेंच्या प्रतिज्ञापत्रापद्दल शंका उपस्थित केला आहे. दोन निवडणुकांमध्ये दिलेल्या माहितीमध्ये फरक आल्याने तांबेंची खरी पदवी कोणती? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. सत्यजीत तांबेंनी आयोगाला खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचाः पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

डॉ. अभिषेक हरिदास यांचे आक्षेप

१. सत्यजित तांबे यांनी सन २०१४ साली २२५-अहमदनगर शहर या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक प्रतिज्ञापत्र /नामनिर्देशन पत्र भरले होते. तर सन २०२३ रोजी पदवीधर मतदारसंघातून निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. आहे मात्र या दोन्ही प्रतिज्ञापत्रांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे.

२. सन २०१४ साली सत्यजीत तांबेंनी मौजे पिंपरणे (ता. संगमनेर) येथील स.नं.७२ हि शेतजमीन दि. ०४/०४/२००९ रोजी ४,८०,००० रुपयात खरेदी केली होती असे नमूद केले आहे. तर सन २०१९ साली त्यांनी हीच शेतजमीन दि ४/०४/२००९ रोजी ५,१२,००० रुपयात खरेदी केली आहे असे नमूद केले आहे.

Satyajeet Tambe News
Legislative Council Elections : पदवीधरच्या मतदारांसाठी अटी अन् उमेदवार अंगठा बहाद्दर असला तरी ओके, वाचा नियम

३. सन २०१४ साली सत्यजीत यांनी BBA(VMRF), DEC 2005, MBA (MIT SCHOOL OF MANG PUNE) PUNE UNIVERSITY, BA (POLITICAL SCI )TECNO GLOBAL UNIV., MA (POLITICAL SCI) PUNE UNIVERSITY, 2014 (APP), ECX EDU FOR IMARGING LIDERS (HAWARD UNIVERSITY),2014 अश्या सर्व शैक्षणिक गुणवत्ता नमूद केल्या होत्या.

४. मात्र त्यांनी सन २०१९ साली BBA VMU university, DEC २००५ असे स्पष्ट नमूद केले आहे. सन २०१९ साली BBA वगळता त्यांनी इतर शैक्षणिक गुणवत्ता का लपवली? असा प्रश्न पडतो तसेच त्यांनी दोन्ही प्रतिज्ञापत्रात BBA दोन वेग वेगळ्या विद्यापीठातून झाल्याचे नमूद केले आहे.

५. सत्यजीत तांबे यांनी म्युचुअल फंडामधील युनिटचा तपशील लपविला आहे.

हे आक्षेप डॉ. अभिषेक हरिदास यांनी घेतलेले आहेत. पदवीधर मतदारसंघातून उभ्या असलेल्या तांबेंच्या पदवीबद्दल शंका उपस्थित झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.