डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी कारखान्न्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे सन २०२१-२२ या वर्षीसाठी दिला जाणारा कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुणे - राज्यातील कडेगांव तालुक्यातील वांगी (जिल्हा सांगली) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी कारखान्न्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे सन २०२१-२२ या वर्षीसाठी दिला जाणारा कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना पुरस्कार जाहीर झाला आहे. यामुळे हा साखर कारखाना राज्यात सर्वोत्कृष्ट ठरला आहे. पुणे जिल्ह्यातील चार कारखान्यांना विविध पाच आणि दोन शेतकऱ्यांना ऊस भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यापैकी दोन पुरस्कार दौंड तालुक्यातील दौंड शुगर या खासगी कारखान्याला जाहीर झाले आहेत.
रोख दोन लाख ५१ हजार रूपये, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे राज्यातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्काराचे स्वरूप आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते येत्या २१ जानेवारीला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संस्थेचे उपाध्यक्ष व माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी (ता.१३) संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा केली.
पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शिरपूर येथील श्री पांडुरंग या दोन कारखान्यांना रोख एक लाख रुपयांचा कै. डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. यासह दौंड शुगरला दक्षिण विभागातील उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन हा अन्य एक पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे जिल्ह्यातील पुरस्कार विजेत्या अन्य कारखान्यांमध्ये जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर, बारामती तालुक्यातील माळेगांव आणि इंदापूर तालुक्यातील निरा-भीमा यांचा समावेश आहे. 'विघ्नहर'ला उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन आणि 'माळेगांव' व 'निरा-भिमा'ला उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रमुख पुरस्कार विजेते कारखाने (कंसात पुरस्काराचे नाव) -
श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना ( कै. विलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार), डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी कारखाना, वांगी (कै. कर्मयोगी शंकररावजी पाटील उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार), जयवंत शुगर्स धावरवाडी, ता.कराड (कै. रावसाहेब पवार उत्कृष्ट आसवनी पुरस्कार), क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, कुंडल, ता. पलूस (कै. किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार).
विभागनिहाय उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार -
दक्षिण विभाग - उदयगिरी शुगर, बामणी (जिल्हा सांगली) व दौंड शुगर्स, आलेगाव, ता. दौंड (जिल्हा पुणे)
उत्तरपूर्व विभाग - कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, ता. अंबड, (जिल्हा जालना).
विभागनिहाय उत्कृष्ट ऊसविकास व संवर्धन पुरस्कार -
दक्षिण विभाग - सह्याद्री सहकारी साखर कारखाना, ता. कराड (जिल्हा सांगली),
मध्य विभाग -- श्री. विघ्नहर सहकारी साखर कारखाना, ता. जुन्नर (जिल्हा पुणे ),
उत्तरपूर्व विभाग -- विलास सहकारी साखर कारखाना, (जिल्हा लातूर ).
विभागनिहाय तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार -
दक्षिण विभाग :- प्रथम - कल्लाप्पाआण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी कारखाना, हातकणंगले, (जिल्हा कोल्हापूर),
मध्य विभाग :- प्रथम - निरा -भिमा सहकारी साखर कारखाना, ता. इंदापूर (जिल्हा पुणे), द्वितीय - माळेगाव सहकारी साखर कारखाना, ता. बारामती (जिल्हा पुणे), तृतीय - लोकनेते मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, ता. नेवासा (जिल्हा नगर)
उत्तरपूर्व विभाग :- प्रथम - विलास सहकारी साखर कारखाना, ता. उदगीर (जिल्हा लातूर), द्वितीय - कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, ता. घनसांगवी, (जिल्हा जालना).
विभागनिहाय उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार -
दक्षिण विभाग - सह्याद्री कारखाना, या. कराड (जिल्हा सातारा)
मध्य विभाग - श्री. विघ्नहर, ता. जुन्नर (जिल्हा पुणे)
उत्तरपूर्व विभाग - विलास सहकारी कारखाना (जिल्हा लातूर).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.