Vijayakumar Gavit : ज्या आदिवासी बांधवांना स्वतःचे घर नाही, त्या आदिवासींना येत्या दोन वर्षांत हक्काचे घर देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज दाखल केल्यावर दोन महिन्यांत संबंधित अर्जदाराला घर मिळेल. याशिवाय, बिरसा मुंडा रस्ते जोड योजनेच्या माध्यमातून सर्व वाड्या, वस्त्या, पाडे बारमाही रस्त्याने जोडणार आहोत.
आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी बुधवारी (ता. २९) येथे केले. (Dr vijaykumar Gavit statement Houses for all tribals in state in 2 years nashik news)
महाकवी कालिदास कलामंदिरात आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आदिवासी सेवक व आदिवासी सेवा संस्था यांना सन २०१९ ते २०२२ या चार वर्षांच्या राज्य पुरस्कारांचे बुधवारी (ता. २९) मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, अप्पर आयुक्त तुषार माळी, माजी आमदार उत्तम इंगळे, शिवराम झोले, एन. डी. गावित, संजय कुलकर्णी, संतोष ठुबे, सुदर्शन नगरे आदी उपस्थित होते.
डॉ. गावित म्हणाले, की आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आदिवासी विकास विभागाबरोबरच आदिवासी सेवक हा महत्त्वाचा दुवा आहे. सेवाभावी मनोवृत्तीतून आदिवासी सेवक व सेवा संस्था या दुर्लक्षित समाजास मदत करीत असतात. समाज उन्नतीसाठी या सेवकांना मिळणारे पुरस्कार हे त्यांच्यासाठी प्रेरक व ऊर्जादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा द्यायची इच्छा असेल, त्यांच्यासाठी सहावीपासूनच अॅकॅडमी सुरू करणार असून, स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने त्यांची तयारी करून घेतली जाणार आहे. डिजिटल माध्यमातून शिक्षणासाठी शिक्षकांनाही आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नयना गुंडे यांनी प्रास्ताविकात आदिवासी विकास विभाग राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदिवासी सेवक, संस्थांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कारार्थींचा परिचय करून देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कारार्थी डॉ. शशिकांत वाणी, नुरानी कुतुबअली, नामदेव नाडेकर, संतोष जनाठे, मधुकर आचार्य यांनी मनोगत व्यक्त केले. अप्पर आयुक्त माळी यांनी आभार मानले.
पुरस्कारार्थींचे नावे
१) सन २०१९-२०२० ः रघुजी येसाजी गवळी, अनिता रामदास घारे, उद्धव पांडुरंग मोरे, जितेंद्र बापूराव चव्हाण, नुरानी हैदरअली कुतुबअली, दगडू रामचंद्र सोनवणे, रूपसिंग बिरबा पाडवी, डॉ. शशिकांत जगन्नाथ वाणी, धाकल जानू खुटाडे, दीपक पांडुरंग साळुंखे, प्रकाश रामचंद्र वायदंडे, जयपाल परशुराम पाटील, भास्कर लडकू दळवी, सुभाष केशवराव येणोरकर, रमेश मिरगुजी उईके.
२) सन २०२०-२०२१ ः अनिल नामदेव वाघ, गमन ईसन सोनवणे, सविता जगदीश जयस्वाल, रवींद्र नागो भुरकंडे, नामदेव लक्ष्मण नाडेकर, तुळा रूपा लांघी, प्रमिला उद्धव मसराम, अशोक म्हाळू इरनक.
कडूदास हरिभाऊ कांबळे, भागोराव नारायण शिरडे, भगवान आश्रू कोकाटे, धोंडिराम किसन थैल, गणपत सहादू मुकणे, बिसन सीताराम सयाम, सखाराम ठका गांगड.
३) सन २०२१-२०२२ ः ज्ञानेश्वर सीताराम भोये, सुरेश पुनाजी पवार, गोसा बहादूर खर्डे, सविता सहदेव मते, किसन मारुती तळपाडे, महादेव आंबो घाटाळ, नागोराव उरकुडा गुरनुले, ठकाजी नारायण कानवडे, सुरेश मुकुंद पागी, रंजना किशोर संखे, वसंत नवशा भसरा, वसंत नारायण कनाके, डॉ. मधुकर गणपत कोटनाके, सीताराम हावशा भिवनकर, वसंत श्यामराव घरटे.
४) सन २०२२-२०२३ ः दत्तात्रय हनुमंता मुठे, श्रावण नानाजी देवरे, ईश्वर संतोष माळी, युवराज दगाजीराव पाटील, मधुकर श्रीराम आचार्य, शीला सुरेश उईके, जितेंद्र चंद्रसेन पाडवी, सीता गणपत किरवे, डॉ. वाळिबा विठ्ठल पोपरे, रत्नाकर तुकाराम घरत, संतोष शिवराम जनाठे, लक्ष्मण ढवळू टोपले, डॉ. चरणजितसिंग बलवीरसिंग सलुजा, बबन धुवालाल गोरामन, दिनेश अंबादास शेराम.
पुरस्कारार्थी आदिवासी सेवा संस्था
(कै.) दिलवरसिंग पाडवी स्मारक स्मृती संस्था, दीनदयाल वनवासी विकास संस्था, श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था, ज्ञान विकास मंडळ, कन्हैयालाल बहुउद्देशीय संस्था, शिक्षणप्रसारक मंडळ- मोरचंडी अन आशा ठाणकी, अहिल्या मंडळ आणि जीवन संवर्धन संस्था.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.