Uttarkashi Tunnel Rescue: अखेर पुन्हा सुरू झालं ड्रिलिंगचं काम; आज रात्रीपर्यंत बाहेर येऊ शकतात बोगद्यात अडकलेले मजूर

बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
Uttarkashi Tunnel Rescue
Uttarkashi Tunnel RescueEsakal
Updated on

बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बचावकार्य अंतिम टप्प्यात आले असतानाच काही तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. बचावकार्य सुरू असतानाच खोदकाम करणाऱ्या ऑगर मशिनमध्ये बिघाड झाला होता. ही समस्या सोडविण्याचे काम काल(गुरूवारी) रात्रभर सुरू होते.

या समस्येमुळे गेल्या 15 ते 16 तासांपासून खोदकामाचे काम होऊ शकले नाही. काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ऑगर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यानंतर ती दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्या प्रयत्नांना आता यश आलं आहे.

Uttarkashi Tunnel Rescue
Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीमधील मजूरांच्या सुटकेसाठी अशा प्रकारे बनवतायत छोटा बोगदा; व्हिडिओ होतोय व्हायरल

उत्तरकाशी बोगदा बचावाकार्यावर पीएमओचे माजी सल्लागार भास्कर खुल्बे म्हणाले की, आता परिस्थिती ठीक आहे. काल रात्री आम्हाला दोन गोष्टींवर काम करायचे होते. प्रथम, आम्हाला मशीनचे प्लॅटफॉर्म पुन्हा कॉन्फिगर करावे लागले आणि नंतर पाईपवर थोडासा दबाव टाकून पुढे जावे लागले. हे पूर्ण झाल्यावर आम्ही ऑगर ड्रिलिंगची प्रक्रिया सुरू केली आहे.

ग्राउंड पेनिट्रेशन रडारचा वापर करून पार्सन्स कंपनीने केलेल्या अभ्यासात पुढील ५ मीटरपर्यंत धातूचा अडथळा नसल्याचे दिसून आले. यानुसार ड्रिल मशिन नीट काम केल्यास पाईप बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या अगदी जवळ पोहोचेल. त्यानंतर सर्व कामगार आज रात्रीपर्यंत बाहेर येण्याची शक्यता आहे.

Uttarkashi Tunnel Rescue
Uttarkashi Tunnel Rescue: उत्तरकाशी बोगद्यातील खोदकाम गेल्या १६ तासांपासून थांबलं, आता घेणार ड्रोनची मदत

ड्रिलिंग सुरू

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर खोदकामाला सुरुवात झाली आहे. कोणताही अडथळा न आल्यास काम आज पूर्ण होईल. त्यानंतर सर्व कामगार आज रात्रीपर्यंत बाहेर येण्याची शक्यता आहे.

वैद्यकीय पथक अलर्ट मोडवर

उत्तरकाशीच्या सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढल्यानंतर त्यांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी एम्सनेही पूर्ण तयारी केली आहे. एम्स प्रशासनाचे म्हणणे आहे की, कामगारांना एम्समध्ये पाठवल्यास त्यांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

PM मोदींनी मुख्यमंत्री धामी यांच्याशी फोनवर केली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी फोनवर चर्चा केली. बचाव कार्याबाबत माहिती घेतली. पंतप्रधानांनी बोगद्यात अडकलेल्या कामगारांची स्थिती आणि त्यांना पुरवल्या जाणार्‍या अन्न आणि दैनंदिन गोष्टींचीही माहिती घेतली. मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या जवानांची स्थिती आणि सुरक्षेबाबतही माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.