सोलापूर : तब्बल तीन लाख तीन हजार ६९४ बेशिस्त वाहनचालकांवर सोलापूर शहर व ग्रामीणच्या वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. विशेष बाब म्हणजे त्यात एकाच वाहनाचा चार-पाचवेळा समावेश आहे. २०२३ मध्ये एका वर्षात शहर-जिल्ह्यातील विविध रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी तब्बल २२ कोटींचा ऑनलाइन दंड करण्यात आला आहे. तरीसुद्धा अनेक वाहनचालकांचा बेशिस्तपणा सुरूच आहे, हे विशेष.
दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट आवश्यक असून त्यांनी ट्रिपल सिट वाहन चालवू नये, वाहन चालविताना मोबाईल टॉकिंग नको, विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये, शहरात किंवा महामार्गावर मर्यादेपेक्षा अधिक वेग नको असे नियम आहेत. चारचाकीच्या चालकासह मागे बसलेल्यांनी सिटबेल्टचा वापर करणे बंधनकारक आहे. रस्ते अपघातात सोलापूर जिल्हा नेहमीच टॉपटेनमध्ये असतानाही बेशिस्तपणा कमी झालेला नाही.
दंडाची रक्कम वाढवूनही फरक पडलेला नाही, अशी वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आता वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२३ या काळात शहर-ग्रामीण पोलिसांनी तीन लाखांवर बेशिस्त वाहनांना दंड केला आहे. ऑनलाइन दंड केला म्हणून निश्चिंत राहणाऱ्या वाहनचालकांना कधी ना कधी तो दंड भरावाच लागणार आहे.
ग्रामीण पोलिसांची २०२३ मधील कारवाई
एकूण बेशिस्त वाहनचालक
१,३२,४४८
बेशिस्तांना केलेला दंड
१०,०३,५७,२००
दंड भरलेले वाहनचालक
२९,६७१
दंडाची रक्कम जमा
१,६५,६८,७५०
-------------------------------------------------------
शहर पोलिसांची कारवाई
एकूण बेशिस्त वाहनचालक
१,७१,२४६
बेशिस्तांवरील अंदाजे दंड
१२.०९ कोटी
लोकअदालतीत दंड भरलेले
६३६०
दंडाची जमा रक्कम
३७,७०,९५०
नियम पाळा अन् अपघात टाळा, सुरक्षित राहा
ग्रामीणमधील शेतकरी किंवा कामगारांनी त्यांच्याकडील वाहनांची दुरुस्ती वेळोवेळी करून घेणे आवश्यक आहे. वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करावा, विरुद्ध दिशेने व अतिवेगाने वाहने चालवू नयेत. इंडिकेटरचा वापर करावा, टेल लाईट मागील वाहनांना दिसत नसल्याने त्यांनी सर्व्हिस रोडचा वापर करावा. लेन कटिंग टाळल्यास अपघात होणार नाहीत.
- कमलाकर पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सोलापूर ग्रामीण
नियम पाळा, बेशिस्तांवर सीसीटीव्हीचा वॉच
शहर पोलिसांकडून दररोज बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत विविध ठिकाणी १६३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्यात मोबाईल टॉकिंग, विरुद्ध दिशेने वाहन चालविणारे, ट्रिपल सिट जाणाऱ्या बेशिस्त वाहनांवर लक्ष ठेवले जात आहे. दररोज अशा वाहनचालकांचे फोटो टिपून त्यांना ऑनलाइन दंड केला जात आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस नाही म्हणून नियम मोडला तरी चालतो हा गैरसमज सर्वांनी मनातून काढावा, असे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.