Lalit Patil : ललित पाटील अन् भावाचा ड्रग्स फॅक्टरीतून मिळणारा नफा ऐकून व्हाल थक्क; पोलिस तपासातून धक्कादायक खुलासा

पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
drug mafia Lalit Patil Bhushan Patil used to earn a net profit of 50 lakhs per month from drug factory crime News
drug mafia Lalit Patil Bhushan Patil used to earn a net profit of 50 lakhs per month from drug factory crime News
Updated on

पुण्याच्या ससून रुग्णालयातून पळालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. फरार झालेल्या ललित पाटील याला पकडण्यासाठी पोलीसांकडून १५ दिवस शोध घेतला जात होता. अखेर कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली.

आता पोलीसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. यादरम्यान पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ललित पाटील आणि त्याचा भाऊ भुषण पाटील त्यांच्या ड्रग्स फॅक्टरीतून दर महिना ५० लाखंचा निव्वळ नफा कमवायचे अशी माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.

drug mafia Lalit Patil Bhushan Patil used to earn a net profit of 50 lakhs per month from drug factory crime News
Lalit Patil Drugs Case: मोठी बातमी! ललित पाटील प्रकरणी पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये.. आणखी एकाला केली अटक

दर महिना बनवायचे ५० किलो एमडी

२०२१ पासून नाशिकच्या शिंदे गावात एमडीचं उत्पादन सुरू होतं. दर महिना ५० किलो एमडीची निर्मिती हे दोघे करायचे. इतकेच नाही तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिकमध्ये हे एमडीचा पुरवठा करायचे. तसेच ड्रग पेडलर्सच्या नेटवर्कच्या मदतीने हा एमडीचा पुरवठा वेगवेगळ्या शहरात केला जात होता.

आत्तापर्यंत १६ आरोपींना साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. तर ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्यांचा साथीदार अभिषेक बलकवडेचा देखील लवकरच मुंबई पोलीस ताबा घेणार आहेत.

drug mafia Lalit Patil Bhushan Patil used to earn a net profit of 50 lakhs per month from drug factory crime News
Lalit Patil Drugs Case: ललित पाटीलवर होणार मोक्का अतंर्गत कारवाई? पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

नेमकं झालं काय?

ललित अनिल पाटील (वय ३४, रा. नाशिक) याची चाकण येथील अमली पदार्थ विक्री प्रकरणात येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर जून महिन्यात त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुख्य आरोपी ललित पाटील याला वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना पोलिसांना चकवा देऊन तो फरार झाला होता. ललित पाटील हा साकीनाका पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यातही मुख्य आरोपी आहे.

ससून रुग्णालयाच्या परिसरात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून सुमारे सव्वादोन कोटींचे मेफेड्रोन अमली पदार्थ जप्त केले होते. या गुन्ह्यात मुख्य आरोपी ललित पाटीलसह त्याचा साथीदार सुभाष मंडल (वय २९, रा, देहू रस्ता, मूळ रा. झारखंड) आणि ससून रुग्णालयाच्या कॅन्टीनमधील कर्मचारी रौफ रहीम शेख (वय १९, रा. ताडीवाला रस्ता) या दोघांना अटक करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.