आता प्रवासासाठी पुन्हा ई-पास आवश्यक; कसा काढायचा?

राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच प्रवासावर निर्बंध घातले असून जिल्हाबंदीही लागू केली आहे.
lockdown
lockdownesakal
Updated on
Summary

राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच प्रवासावर निर्बंध घातले असून जिल्हाबंदीही लागू केली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला असून संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच प्रवासावर निर्बंध घातले असून जिल्हाबंदीही लागू केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रवासासाठी ई पास सुरु करण्यात आले आहेत. यासाठी अर्ज करून प्रवास करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. आता प्रवास करायचा असेल तर आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास काढावा लागेल.

नागरिकांना अत्यावश्यक कारणासाठी प्रवास करायाच असेल तर ई पास काढून तो करता येईल. यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी संकेतस्थळावरून नागरिकांनी अर्ज करावा आणि ई पास काढून प्रवास करा असं आवाहन केलं आहे. ऑनलाइन ई पास काढण्यामध्ये अडचण येत असेल तर त्यासाठी पोलिस स्टेशनची मदत घेऊ शकता असंही महाराष्ट्र पोलिसांच्यावतीने सांगण्यात आलं आहे.

lockdown
पुणे जिल्ह्यात 1 मेपर्यंत काय असतील निर्बंध? 18 प्रश्नांची उत्तरे

ई पास कसा काढायचा?

ई पास काढण्यासाठी तुम्ही https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर जा.

संकेतस्थळावर 'apply for pass here' पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही माहिती भरावी लागेल.

त्यामध्ये तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून कुठे प्रवास करायचा आहे ते निवडा.

तुम्हाला काही कागदपत्रे इथे जोडावी लागतील.

प्रवास कोणत्या कारणासाठी करत आहेत याची माहिती द्या.

कागदपत्रांची माहिती एकत्रित घेऊन ती अपलोड करा.

lockdown
केंद्र सरकारशी दोन हात करण्यासाठी पुढे या

टोकन आयडी

तुम्ही अर्ज केल्यानंतर एक टोकन आयडी मिळतो. तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही? तसंच ई पास काढण्यासाठी तो टोकन आयडी गरजेचा आहे. टोकन आयडी टाकून साइटवरून ई पास डाऊनलोड करता येतो.

ई पासवर तुमची वैयक्तिक माहिती, खासगी वाहनाने प्रवास करणार असल्यास त्याचा क्रमांक, पासची वैधता, क्यूआर कोड इत्यादी माहिती असते.

ई पासची हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी सोबत ठेवावी लागेल. पोलिसांनी विचारणा केली तर त्यांना हा पास दाखवून प्रवास करता येतो.

lockdown
राज्यात पावसाचा अंदाज; पुण्यात तापमान घटले

कोणत्या कारणासाठी ई पास काढू शकता?

कुटुंबातील व्यक्तीचे लग्न, अंत्यविधी यासाठी ई पास घेता येतो.

आरोग्यसंबंधित तक्रार असेल त्यासाठी प्रवास करण्यासाठी ई पास मिळतो.

अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना ई पासची गरज नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()