कशामुळे ढासळली अर्थव्यवस्था.. सविस्तर वाचा 

Economy Collapsed due to Declining in Biodiversity
Economy Collapsed due to Declining in Biodiversity
Updated on

नागपूर :  जैवविविधता आणि पर्यावरण नष्ट होत असल्याने अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अन्न कुठे आणि कसे पिकवायचे असा नवा पेच उभा ठाकला आहे. यातून जगाची अर्थव्यवस्था ढासळली आहे असा अहवाल नुकताच वर्ल्ड वाईल्ड लाइफ फंड आणि झुऑलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन या संस्थानी जाहीर केला आहे. वनांचा झालेला ऱ्हास आणि पुरेशी शेती होत असल्याने ही अडचण निर्माण झाल्याचेही त्यांनी अहवालात म्हटले आहे.  

ग्लोबल लिविंग प्लॅनेट इंडेक्समध्ये सातत्याने घसरत आहे. १९७० ते २०१६ या वर्षा दरम्यान ही घसरण ६८ टक्के झाली आहे. त्यात सस्तन, उभयचर, सरपटणारे प्राणी आणि मासोळ्यांच्या प्रजातींचा समावेश आहे. या दोन्ही वन्यजीव अभ्यास करणाऱ्या संस्थानी या निष्कर्षासाठी २१ हजार सजीवांचा आणि ४ हजार ३९२ प्रजातींचा अभ्यास केला. २०१८ मध्ये अभ्यास केला असता त्यापेक्षा ४०० नव्या प्रजातींचा २०२० या वर्षाच्या अभ्यासात समावेश केला आहे. या अहवालामध्ये इतरही निर्देशांक काढण्यात आले आहेत. त्यानुसार जैवविविधता निर्देशांक ७९ टक्के, आय. यु. सी. एन रेड लिस्ट इंडेक्स १ टक्के, स्पेसिस हेबीटॅट इंडेक्स दोन टक्के, लिविंग प्लॅनेट इंडेक्स ७३ टक्के, जमीन जैवविविधता इंडेक्स १० टक्के, पृथ्वीवर एकूण ६० हजार वृक्ष प्रजाती आहेत. त्यापैकी वृक्ष प्रजातीचा ऱ्हास २२ टक्के आहे.

पृथ्वीवरील वृक्षांच्या ४३१ प्रजाती कायमच्या नष्ट झाल्या आहेत. ५० लाख लाख कीटकांच्या प्रजाती असून त्यातील वार्षिक ऱ्हास ८.८ टक्के इतका आहे. ९४४ प्रजातींचा अभ्यास करून १९७० नंतर सस्तन, पक्षी, सरपटणारे आणि उभयचरांचा ८४ टक्के ऱ्हास झाला आहे. दरवर्षी हा ऱ्हास होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

वाघ, पांडा आणि ध्रुवीय भालू सारख्या मोठ्या प्रजातीची संख्या जिथे कमी होत आहे. तिथे जंगल, पाणी, समुद्रातील कीटक आणि लहान प्रजातींची जैवविविधता किती कमी होत असेल याचा यावरून अंदाज सुद्धा घेणे अशक्य असल्याचे अहवालात म्हटले आहे. औद्योगिक क्रांतीनंतर सतत जंगलाचा ऱ्हास होत गेला. सोबतच गवताळ प्रदेश, दलदल प्रदेश आणि इतर महत्त्वाच्या परिसंस्थाचा मोठा ऱ्हास झाला आहे. गेल्या ५० वर्षात लोकसंख्या वाढ, जागतिक व्यापार वाढ, शहरीकरण वाढल्यामुळे आणि निसर्गात मानवी हस्तक्षेप वाढल्याने मानवी जीवन जगण्यासाठी आवश्यक अशा सजीव प्रजातींचा ऱ्हास झाला आहे हे धोक्याचे असल्याचे शास्त्रज्ञांनी वारंवार सांगितले आहे.

१९७० पर्यंत निसर्गाची पुनर्निर्माण क्षमता होती. परंतु, २१ व्या शतकात ती संपली आणि जैवविविधता ५६ टक्क्यांनी घटली आहे. जैवविविधता आणि पर्यावरण नष्ट होत असल्याने अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अन्न कुठे आणि कसे पिकवायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातूनच अर्थव्यवस्था ढासळली आहे असेही अहवालात नमूद केलेले आहे. युनायटेड नेशन इमर्जन्सी फोर्सच्या अलीकडच्या आकडेवारीनुसार दरडोई नैसर्गिक १९९० पर्यंत उत्पादन ४० टक्क्यांनी कमी झालेले आहे. मात्र, औद्योगिक आणि इतर उत्पादनात १३ टक्के वाढ झालेली आहे. असे असताना अजूनही आपल्या आर्थिक धोरण ठरविणाऱ्यांना ही गंभीर कळली नसल्याचेही अहवालात म्हटले आहे. 

सजीवांचे दोहन थांबवावे

सजीव प्रजाती आणि अधिवास ऱ्हास अजूनही असाच चालू आहे. मात्र, हा ऱ्हास रोखण्यासाठी फार थोडे देश प्रयत्न करीत आहेत. वाढत्या हवामान बदलाचा वाढत्या धोक्यामुळे हे संकट वाढणार आहे. हे सर्व वाचवण्यासाठी जमिनीच्या वापराची पद्धत बदलू नये, सजीवांचे दोहन थांबवावे, रोग आणि प्रदेश बाह्य प्रजातींना रोखावे, प्रदूषण नियंत्रण करावे आणि हवामान बदल थांबवावा अशा सूचना अहवालात देण्यात आलेल्या आहेत.  प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण अभ्यासक 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.