Rohit Pawar ED Enquiry: रोहित पवारांची आज ED चौकशी; शरद पवार गटाचं शक्तिप्रदर्शन

Rohit Pawar ED Enquiry: Sharad Pawar grandnephew Will Visit Enforcement Directorate Mumbai Maharashtra bank case NCP Protest Marathi News | राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांची आज ईडीकडून (ED) चौकशी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस रोहित पवार यांच्या समर्थनात शक्तिप्रदर्शन करणार आहे.
Rohit Pawar ED Enquiry
Rohit Pawar ED EnquiryEsakal
Updated on

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांची आज ईडीकडून (ED) चौकशी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस रोहित पवार यांच्या समर्थनात शक्तिप्रदर्शन करणार आहे. तर रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच असणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत. ईडीला चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

आमदार रोहित पवार हे आज हॅाटेल ड्रायडंट येथून १०. ३० वाजता ईडी कार्यालयाकडे निघणार आहेत. तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे ९.४५ वाजता सिल्व्हर ओक येथून पक्ष कार्यालयासाठी निघणार आहेत. शरद पवार १० वाजल्यापासून पक्ष कार्यालयात असतील तर रोहित पवार हे १०.४५ पर्यंत पोहोचतील. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून १० वाजल्यापासून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Rohit Pawar ED Enquiry
Rohit Pawar ED Enquiry : शरद पवार रोहित पवारांच्या पाठिशी! पुन्हा जाणार ईडी कार्यालयात

सकाळी ११ वाजता रोहित पवार ईडी कार्यालयात दाखल होतील. मात्र, त्यापूर्वी पक्ष कार्यालयात जाऊन ते शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची भेट घेणार आहेत. या दरम्यान राष्ट्रवादीकडून मोठं शक्तीप्रदर्शन केल जाणार आहे.

आज (बुधवारी) मुंबईतील ईडीच्या कार्यालयात रोहित पवार चौकशीसाठी जाणार आहेत. यावेळी आपण ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. तसे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे या देखील सोबत येणार असल्याचेही रोहित पवारांनी सांगितले आहे.

Rohit Pawar ED Enquiry
Rohit Pawar यांना summons आल्यानंतर Sharad Pawar ही मैदानात, नातवासोबत ED कार्यालयात

दरम्यान रोहित पवारांनी ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला असल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडीकडून रोहित पवारांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित लिलाव प्रक्रियेमध्ये बारामती अ‍ॅग्रो कंपनीचा काही संबंध होता का? याविषयी ही चौकशी होणार आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वी शरद पवार यांची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. शरद पवार अगदी तत्परतेने ईडीच्या कार्यालयात पोहचले होते. आता शरद पवार पुन्हा एकदा रोहित पवारांसोबत ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.

Rohit Pawar ED Enquiry
Babri Banner in Pune: पुणे एफटीआयआय बॅनर प्रकरणी पोलिसांची कारवाई; डेक्कन पोलिसांत १५ जणांविरोधात गुन्हे दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.