EDचं पुढचं टार्गेट अशोक चव्हाण? चंद्रकांत पाटलांनी दिले संकेत

chandrakant patil
chandrakant patilesakal
Updated on

नांदेड : ...तर या पुढची ईडीची (ED action) कारवाई थेट नांदेडमध्ये होणार असल्याचे संकेतच खुद्द भाजपाचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी दिले आहे. तुम्हाला माझ्या हसण्याचा काय अर्थ काढायचा तो काढा? असंही पाटील सांगून मोकळे झाले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

पुढची कारवाई नांदेडच्या नेत्यावर होणार का?

महाविकास आघाडीच्या नेत्याजवळच्या लोकांवर सध्या केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवाया सुरू आहेत. तर एकीकडे सत्ताधारी पक्षाकडून भाजपचेच नेते केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये एका व्यापाऱ्याच्या कार्यालयात देखील आयकर विभागाने धाड टाकली होती. ईडी किंवा आयकर विभागाची आता पुढची कारवाई नांदेडच्या नेत्यावर होणार का? असा प्रश्न भाजपाचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारला असता त्यांनी अप्रत्यक्षपणे तसे संकेत दिले.

chandrakant patil
'या' दोन गोष्टींवर बोलायला मोदींची बोबडी वळते; ओवैसींचा घणाघात

अशोक चव्हाणांकडे बोट?

'मी काही त्या तपास यंत्रणाचा अधिकारी नाही. पण माझ्या हसण्यावरून तुम्ही समजून घ्या' असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे अप्रत्यक्षपणे बोट केलं. नांदेडमधील देगलूर पोटनिवडणूक सुरू असून भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे (subhash sabane) यांना उमेदवारी दिली. भाजपने उमेदवार आयात केल्याने काँग्रेसला (congress) ही निवडणूक जड जाणार होती. त्यात अशोक चव्हाण यांनी देखील खेळी केली. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर (bhaskar patil khatgaonkar) यांना काँग्रेसमध्ये आणलं. भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये गेल्याने भाजपा चांगलच धक्का लागला. खतगावकर यांच्या निर्णयानंतर भाजपाचे चंद्रकांत पाटील तातडीने देगलूरला आले.

chandrakant patil
पंतप्रधानांनी बुद्धांची मूर्ती ट्विट करताच, भारतीयांनी दिला 'हा' सल्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.