शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश! शाळा १५ जूनपासून, पण शिक्षकांना १३ जूनपासूनच शाळेत हजर राहावे लागणार

शैक्षणिक वर्षाची सुरवात १५ जूनपासून होणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे स्वागत केले जाणार आहे. शाळेची स्वच्छता, सजावट करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सर्वच शिक्षकांना १३ जूनपासूनच शाळेत हजर राहण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
schools
schoolssakal
Updated on

सोलापूर : २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाची सुरवात १५ जूनपासून होणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. शाळेची स्वच्छता, सजावट करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सर्वच शिक्षकांना १३ जूनपासूनच शाळेत हजर राहण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी दिल्या आहेत.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळा असून त्याअंतर्गत सव्वादोन लाखांपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उन्हाळा सुटीनंतर विद्यार्थ्यांचे मन रमावे, पहिलीत पदार्पण केलेल्या विद्यार्थ्यांना शाळा, शिक्षकांविषयी भीती राहू नये, यासाठी पहिल्या दिवशी १५ जून रोजी घोडा, उंट, बैलगाडीतून त्यांचे स्वागत केले जाणार आहे.

शाळेची सजावट केली जाणार असून परिसरात रांगोळी काढली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी पुष्पगुच्छ देऊन स्वागत होईल. त्यांना पहिल्याच दिवशी एक गणवेश व पाठ्यपुस्तके देण्याचे देखील नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड भात दिला जाणार आहे. पहिल्या दिवशी थेट अध्यापन सुरु न करता विद्यार्थ्यांचे खेळ घ्यावेत, गोष्टी सांगाव्यात, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.

शिक्षकांनी करावी विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाची तयारी

जिल्ह्यातील जवळपास साडेबाराशे शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली झाली असून नवीन शैक्षणिक वर्षात त्यांना नवीन शाळेत रुजू व्हावे लागेल. दुसरीकडे आणखी ८३ शिक्षक आंतरजिल्हा बदलीतून आले आहेत. त्यांनाही नियुक्ती दिली जाणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे स्वागत करण्यासाठी सर्व शिक्षकांना १३ जूनपासून त्याची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

- संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.