Maharashtra School Teacher News : इंग्रजी माध्यमाचेच शिक्षक देणार इंग्रजीचे धडे! शासनाचे परिपत्रक

Education in English medium was essential for post of teaching English in schools news
Education in English medium was essential for post of teaching English in schools newsesakal
Updated on

School Teacher News : तब्बल १२ वर्षांपासून राज्यात शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे अनेक शाळांना शिक्षक नाहीत, असे असताना राज्य शासनाने आता केंद्रशाळा स्तरावर अन्य शाळांतील शिक्षकांना इंग्रजी शिकविण्यासाठीच्या पदासाठी इंग्रजी माध्यमातील शिक्षणच अत्यावश्यक केले आहे.

तसा शासन निर्णय निर्गमित केला आहे. यामुळे शाळांमधील रिक्त जागांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र मराठी शाळांसाठी हे धोकादायक असल्याचा आरोप करीत शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. (Education in English medium was essential for post of teaching English in schools news)

शिक्षक भरतीत केंद्र शाळांसाठी इंग्रजी माध्यमातील पदवीधरांना राखीव कोटा ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पवित्र पोर्टलद्वारे केंद्रस्तरावर साधन व्यक्ती म्हणून निवडल्या जाणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून असले पाहिजे, अशी अट लागू करण्यात आली आहे. परिपत्रकानुसार केंद्रशाळा स्तरावर अन्य शाळांतील शिक्षकांना इंग्रजी भाषेचे तंत्र शिकविण्यासाठी या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थिसंख्या वाढण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी केंद्रस्तरावर साधन व्यक्ती नेमून त्यांच्यामार्फत इंग्रजी अध्यापनात सुधारणा होण्यासाठी शिक्षकांना इंग्रजीचे धडे देण्याचे प्रस्तावित आहे.

त्यामुळे शिक्षकांचे इंग्रजीमधून अध्यापनाबाबतचे तंत्र विकसित होऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारेल. परिणामी शाळांत पटसंख्या वाढेल, असे परिपत्रकात म्हटले आहे.

अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी शिक्षण मराठीतून देण्याच्या हालचाली सुरू असताना शिक्षक भरतीसाठी इंग्रजीची सक्ती कशासाठी असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे.

Education in English medium was essential for post of teaching English in schools news
Maharashtra Politics : साहेब नव्यांच्या शोधात, दादा अजूनही जुन्यांच्याच प्रेमात

दरम्यान, राज्यभरातील इंग्रजी, सेमी इंग्रजी, मराठी शाळांची संख्या, तेथील इंग्रजी शिक्षकांची संख्या, त्यांच्या रिक्त जागा प्रत्येक जिल्ह्यात इंग्रजी शिक्षकांची संख्या किती आहे, याची माहिती शासनाने मागविली आहे. मराठी भाषेतून डी.एड., बी.एड. करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय करणारे हे परिपत्रक मागे घेण्याची मागणी होत आहे.

अशी होणार साधन व्यक्तीची निवड

संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले, तसेच संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता इतर कोणत्याही माध्यमातून, दहावी किंवा बारावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून, संपूर्ण शिक्षण कोणत्याही माध्यमातून व व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून झालेल्या उमेदवाराची साधन व्यक्ती म्हणून निवड करण्यात येईल, असे शासन आदेशात म्हटले आहे.

"इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेली व्यक्ती मराठी शाळांच्या शिक्षकांना शिकवणार, असे शासन म्हणत असले तरी मराठी शाळेतील शिक्षक इंग्रजी शिकवू शकत नाहीत का, असा सवाल शिक्षक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. मराठी माध्यमाचे शिक्षक कोणत्याही स्तरावर कमी नाहीत. ते विद्यार्थ्यांना उत्तम इंग्रजी शिकवू शकतात, तसेच शिक्षकांनाही शिकवतील. शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा." -एस. बी. देशमुख, सचिव, मुख्याध्यापक संघ, नाशिक

Education in English medium was essential for post of teaching English in schools news
Maharashtra Politics: भाजपला धक्का! माजी प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार करणार ठाकरे गटात प्रवेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()