It is difficult for Sangola taluka to get beds for the treatment of corona patients
It is difficult for Sangola taluka to get beds for the treatment of corona patientsesakal

८५ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत! लसीकरणामुळे मृत्यूदर घटला; ७.२५ कोटी व्यक्ती सुरक्षित

सध्याच्या नवीन रुग्णांमध्ये ८५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तर १३ टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून एकूण रुग्णांपैकी केवळ २ टक्के रुग्णांनाच हॉस्पिटलमध्ये जावे लागत असल्याची माहिती आरोग्य संचालक डॉ. नितीन आंबाडेकर यांनी दिली.
Published on

सोलापूर : राज्यातील मोठ्या शहरांमध्ये कोरोना वाढत असून एकमेकांच्या संपर्कातून लगेचच कोरोनाची बाधा होत आहे. पण, दिलासादायक बाब म्हणजे सध्याच्या नवीन रुग्णांमध्ये ८५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तर १३ टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून एकूण रुग्णांपैकी केवळ २ टक्के रुग्णांनाच हॉस्पिटलमध्ये जावे लागत असल्याची माहिती आरोग्य संचालक डॉ. नितीन आंबाडेकर यांनी दिली.

It is difficult for Sangola taluka to get beds for the treatment of corona patients
दारू गाळणाऱ्या हातांनी बनविला ‘बंजारा’ ब्रॅण्ड! हातभट्टी दारूमुक्तीकडे सोलापूरची वाटचाल

राज्यात २७ मेपासून राज्यातील काही शहरांमध्ये रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाच्या तिन्ही लाटा येऊन गेल्यानंतर आता राज्य चौथ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. प्रत्येक नागरिकांनी प्रतिबंधित लस घेतली, मास्कचा वापर केल्यास कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि बेड्‌सविना कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. कोरोनाचा मृत्यूदर घटला असून मागील आठ दिवसांत कोरोनामुळे राज्यातील केवळ सहा लोकांचा मृत्यू झाला असून त्यातील बहुतेकजण वयस्क होते. दरम्यान, कोरोना पुन्हा जोर धरू लागला असून आता पावसाळ्याचे दिवस असल्याने रुग्णसंख्या वाढू शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. तत्पूर्वी, प्रतिबंधित लसीकरण आणि टेस्टिंग वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्यात प्राधान्याने १२ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरणावर फोकस केला जात आहे. अजूनही राज्यातील एक कोटी विद्यार्थ्यांपैकी ३६ लाख ६३ हजार मुलांनी लशीचा एकही डोस घेतलेला नाही.

It is difficult for Sangola taluka to get beds for the treatment of corona patients
ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय! १० गुंठ्यांपर्यंत जमीन खरेदी-विक्रीला परवानगी

कोरोना वाढणारी शहरे अन्‌ जिल्हे

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, कल्याण डोंबविली, मीरा-भाईंदर, वसई-विरार या शहरांसह रायगड, पुणे, ठाणे, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्येही रुग्ण वाढत आहेत. ३१ मे रोजी राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या साडेतीन हजारांपर्यंत होती. आता सहा दिवसांतच रुग्णसंख्या सात हजार ४२९ झाली. प्रत्येकास आता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा लागणार आहे.

It is difficult for Sangola taluka to get beds for the treatment of corona patients
आमदाराला दरमहा २.६१ लाख; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे वेतन २.८५ लाख

सव्वासात कोटी लोक सुरक्षित

राज्यातील १२ ते १४ वयोगटातील ३९ लाख १९ हजारांपैकी साडेनऊ लाख तर १५ ते १८ वयोगटातील ६० लाख ६४ हजारांपैकी २७ लाख ५७ हजार विद्यार्थ्यांनी कोरोनावरील लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर १८ वर्षांवरील नऊ कोटी १४ लाख ३५ हजारांपैकी सात कोटी व्यक्तींनी दोन्ही डोस घेतले आहेत. दोन्ही डोस घेतलेल्या राज्यातील जवळपास सव्वासात कोटी व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी असल्याचेही आरोग्य विभागाने नमूद केले आहे.

It is difficult for Sangola taluka to get beds for the treatment of corona patients
सोलापुरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले! नुतन पोलिस आयुक्तांचा कारवाईचा धडाका

खबरदारी म्हणून सर्वांनी मास्क वापरावा, लशीचे दोन्ही डोस घ्यावेत

सध्याच्या एकूण रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. १३ टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. राज्यातील काही शहरांमध्ये रुग्ण वाढत असून खबरदारी म्हणून सर्वांनी मास्क वापरावा, लशीचे दोन्ही डोस घ्यावेत.

- डॉ. नितीन आंबाडेकर, संचालक, सार्वजनिक आरोग्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()