Eknath Khadse: एकनाथ खडसेंनी घेतली अमित शाहांची भेट! रक्षा खडसे देखील सोबत असल्याचा Video समोर, भेटीदरम्यान काय झाली चर्चा?

Eknath Khadse: एकनाथ खडसे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Eknath Khadse
Eknath KhadseEsakal
Updated on

एकनाथ खडसे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ खडसेंसोबत खासदार रक्षा खडसे यांनी देखील गुरुवारी अमित शहांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. अद्याप एकनाथ खडसे भाजप प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. अशातच अमित शहांसोबतची त्यांची भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. तर या भेटीबाबत साम टिव्ही मराठीशी बोलताना खडसेंनी माझा अनौपचारीक पक्षप्रवेश झाला असं म्हटलं आहे.

या भेटीनंतर अनेक दिवसांपासून रखडलेल्या एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. एकीकडे एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश रखडलेला असताना, दुसरीकडे अमित शहांसोबतच्या भेटीला राजकीय वर्तुळात मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच मोठी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा सुरू होती.

Eknath Khadse
GST आयुक्तांच्या रिसॉर्टला वीजपुरवठ्यासाठी 51.86 लाख, आमदार पाटलांकडून शासकीय निधीचा गैरवापर; काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

दरम्यान, ही सदिच्छा भेट होती, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे. या भेटीदरम्यान अमित शाह आणि एकनाथ खडसे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी सून रक्षा खडसे यांच्यासाठी भाजपला पाठिंबा देत महत्त्वाची राजकीय भूमिका बजावली होती.

Eknath Khadse
NEET paper leak case Update: अमित-नितीश फक्त चेले, NEET पेपर लीक प्रकरणाचे 'मुख्य सुत्रधार' वेगळाच? आहे महाराष्ट्राशी थेट कनेक्शन

एकनाथ खडसेंना मिळणार मोठी जबाबदारी

भाजपमध्ये घरवापसी होताच एकनाथ खडसेंच्या हाती मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. पक्षात प्रवेशानंतर खडसेंच्या हाती मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. एकनाथ खडसे आधी भाजपमध्ये होते, त्यांना पक्ष वाढीसाठी मोठं काम केलं आहे. त्यांना भाजप आणि संघाची रणनीती माहिती आहे, त्यामुळे त्यांच्या हाती मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.