मुंबई : सध्या राज्यभर विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकांसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यसभा निवडणुका उद्या होणार आहेत तर २० जूनला विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडत आहेत. दरम्यान यासाठी सर्व पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची घोषणा केली जात आहे. राष्ट्रवादीने विधानपरिषदेसाठी एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली असून ते आज अर्ज दाखल करणार आहेत.
(Eknath Khadse On Maharashtra legislative Council Election)
राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे एकनाथ खडसे यांनी आभार मानले आहे. यासंदर्भात ते माध्यमांना बोलत होते. "विधानसभेच्या कालखंडात ज्या घटना घडल्या त्यामुळे मला भाजपातून राष्ट्रवादीमध्ये यावं लागलं असं ते बोलताना म्हणाले. मला भाजपने फक्त गाजर दाखवलं. सत्ता माझ्या दृष्टीकोनातून मोठी नाही. पण ज्या प्रकारे मला आधार राष्ट्रवादीने दिला तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझ्या पडत्या काळात माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्यांवर प्रामाणिक राहणं माझं कर्तव्य आहे." असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
"शरद पवारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली. पण आज महाराष्ट्रातल्या भाजपमध्ये गोपीनाथ मुंडेंचं योगदान मोठं आहे. मुंडे-महाजन-खडसे यांनी भाजप महाराष्ट्रात मोठी केली, पण भाजपने पंकजा मुंडे यांना तिकीट न देणं ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे, खेदजनक आहे, हे पंकजासाठी अन्याय आहे. ज्यांचं पक्षासाठी योगदान नाही ते पदावर बसतात हे खूप दुर्दैवी आहे. भाजपने पंकजा यांचा विचार करायला पाहिजे होता." असं मत खडसे यांनी व्यक्त केलं आहे.
राज्यसभेसाठी सध्या घोडेबाजार सुरू आहे. २३ वर्षामध्ये असं कधी झालं नव्हतं. इतके वर्षे सामंजस्याने प्रश्न सुटत होते पण सध्या पक्ष ज्या भूमिका घेतात ते लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही असं खडसे बोलताना म्हणाले. तसेच राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे आभार मानत भाजपने पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय केल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.