Devendra Fadnavis : ''अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली त्यावेळी तुमचा मालक कोण होता?'' खडसेंचा कळीचा मुद्दा

eknath khadase
eknath khadaseesakal
Updated on

मुंबईः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना काळे झेंडे दाखवण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी घेतली होती. त्याला देवेंद्र फडणवीसांनी कडक शब्दांमध्ये उत्तर दिलं होतं. फडणवीसांच्या टीकेचा समाचार आता खडसेंनी घेतला आहे. २०१९मध्ये पहाटेच्या शपथविधीची आठवण त्यांनी करुन दिली.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

जळगावमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असून त्यानिमित्त देवेंद्र फडणवीस जळगावच्या दौऱ्यावर जात आहेत. फडणवीस म्हणाले की, एकनाथ खसडेंनी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिलाय आहे पण काळे झेंडे दाखवून काय मिळणार आहे? खसडेंचं असं झालंय की त्यांना नवीन मालक मिळाला आहे ते सांगतील तसं खडसेंना वागावं लागतं. जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर काळे झेंडे दाखवायची वेळ आली नसती. ते परिवारात राहिले असते. परंतु या काळ्या झेंड्यांना आम्ही घाबरत नाही. जळगावची जनता आमच्यासोबत आहे.

eknath khadase
World Cup 2023 schedule: डे-नाईटच्या सामन्यांच्या वेळेत बदल, जाणून घ्या काय आहे टायमिंग

एकनाथ खडसेंचं उत्तर

देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर देतांना एकनाथ खडसे म्हणाले की, ते ज्या पक्षामध्ये काम करत आहेत त्या पक्षामध्ये मी होतो तेव्हा मी त्यांचा मालक होतो. त्यांनी अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन केली त्यावेळी त्यांचे मालक कोण होते?अजित पवार होते का? असा सवाल खडसेंनी उपस्थित केला. जर मी एवढा नालायक होतो तर इतके वर्षे माझ्या हाताखाली का काम केलं, असंही खडसे म्हणाले.

eknath khadase
Ashadhi Ekadashi 2023: कळवणच्या प्रती पंढरपूर विठ्ठल मंदिरात जय्यत तयारी! विविध कार्यक्रमांचे आयोजन

फडणवीस यांनी वैयक्तिक आरोप करण्यापेक्षा कर्तव्याला महत्व देणं गरजेचं आहे. वैयक्तिक पातळीवर आरोप करणं बालिशपणा असून त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी खडसे यांनी यावेळी बोलतांना केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.