मुंबई : केवळ जळगावचे दोन आमदारच माझे समर्थक आहे असे नाही. भाजपमध्ये (BJP) माझे अनेक समर्थक आहेत. ते आजही माझ्यावर प्रेम करतात. मात्र, ते पक्ष सोडून मला मतदान करतील असे वाटत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे (Eknath Khadse) प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले. (Eknath Khadses big statement; Not only my two but many supporters in BJP)
एकनाथ खडसे यांनी रविवारी (ता. १९) बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. हितेंद्र ठाकूर यांच्याशी माझे ३२ वर्षांपासून संबंध आहे. राजकारणापलीकडे आम्ही एकमेकांना ओळखतो. म्हणून मी त्यांना मत मागण्यासाठी आलो होतो. शेवटी मतदान कोणाला करायचा हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असेही एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (national congress party) मतांजी जुळवाजुळव सुरू झाली आहे. यामुळेच मी हिंतेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. ठाकूर यांना मी शब्द मागायला आलो नव्हतो तर मत मागण्यासाठी आलो होतो. मत करण्याचा निर्णय शेवटी त्यांचा आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.
भाजपमधील (BJP) अनेकांना तिकीट मिळवून देण्यासाठी मदत केली. मंत्रिमंडळात स्थान देण्यासीठीही मदत केली. यामुळे अनेकजण माझ्यावर प्रेम करतात. मात्र, पक्ष सोडून ते मला मतदान करतील असे वाटत नाही. कारण, प्रत्येकावर काही ना काही जबाबदारी असते. अनेकजण माझ्या संपर्कात आहे, असेही एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले.
भाजप मला पाडण्याचा प्रयत्न करेल हे स्वाभाविकच
आपल्याविरोधकांच्या विरोधात मतदान झाले पाहिजे, असे प्रत्येकाला वाटते. भाजपचा उमेदवार निवडूण येऊ नये अशी आमची भूमिका आहे. यामुळे मला पाडण्याचा भाजप प्रयत्न करेल याचा प्रश्नच येत नाही. हे सर्वांसाठी सारखेच आहे. मात्र, निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील, अशी आशा एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.