Maharashtra Politics: पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं; CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsEsakal
Updated on

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल (शनिवार) संध्याकाळी पुण्यात दाखल झाले आहेत. आज ते पिंपरी-चिंचवड येथील मोरे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहे. अमित शाह यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हजर राहणार आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पुण्यात आहेत. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यरात्रीपर्यंत अमित शहा यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

'जे डब्ल्यू मैरियट' हॉटेलमध्ये राज्यातील दोन्ही नेत्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी एक महत्वाची बैठक देखील पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारावर चर्चा झाल्याची शक्यता तर्तवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. अजित पवार आणि समर्थक आमदारांनी मंत्रीपदीची शपथ घेतली. त्यानंतर खातेवाटप झाले. मात्र, महायुती सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन कालच्या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंबधीचे वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे.

Maharashtra Politics
Amit Shah Pune Visit : गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर; शहरातील 'हे' रस्ते असणार बंद, प्रेक्षकगृहाला छावणीचं स्वरुप

दरम्यान अजित पवारांनी महायुतीत प्रवेश केल्यानंतर अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार गटातील नव्या मंत्र्यांसाठी तत्कालीन मंत्र्यांच्या हातातील खाती काढून घेण्यात आली होती. त्यांना दुसरी खाती देण्यात आली होती. खात्यांमध्ये फेरबदल करण्यात आले होते. पण मंत्रिमंडळाचा विस्तार त्यावेळी झाला नव्हता. पावसाळी अधिवेशन संपताच घडामोडींना मोठा वेग आला आहे. त्यामुळे अमित शाह, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या आजच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics
Ajit Pawar : उपसा जलसिंचन योजनांचा प्रतीयुनिट वीजेचा दर पूर्ववत ; ६७५ कोटींचा भार राज्यसरकाच्या तिजोरीवर; अजित पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.