Ajit Pawar: लोकसभेत पराभव, ठाकरे पवारांसोबत सहानुभूती तरीही विधानपरिषदेत का नाही फुटले शिंदें व दादांचे आमदार?

Eknath Shinde: ठाकरेंची सुद्धा काही मत फुटली असल्याचे चित्र आहे. यामागे महत्त्वाची काही कारणं आहेत
Ajit Pawar: लोकसभेत पराभव, ठाकरे पवारांसोबत सहानुभूती तरीही विधानपरिषदेत का नाही फुटले शिंदें व दादांचे आमदार?
ajit pawar and ekanth shinde sakal
Updated on

Maharashtra Politics: एका बाजूला नुकतीच लोकसभा निवडणूक झाली. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जनतेने साथ दिल्याचे पाहायला मिळाले. अशावेळी विधानपरिषद निवडणुकीमध्ये ऐनवेळी आमदार शिंदे आणि अजित पवारांची साथ सोडून शरद पवार आणि ठाकरेंना पाठिंबा देतील असे बोलले जात होते.

मात्र वास्तविक पाहता असे काहीही झाले नाही. भाजपचे ५ शिंदेंचे २ अजित पवारांचे २ असे ९ उमेदवार निवडून आले. तर दुसकडे कॉंग्रेसची ७ मत फुटली. तर ठाकरेंची सुद्धा काही मत फुटली असल्याचे चित्र आहे. यामागे महत्त्वाची काही कारणं आहेत. (why did Eknath Shinde and ajit pawar MLAs not split in Legislative Council election?)

Ajit Pawar: लोकसभेत पराभव, ठाकरे पवारांसोबत सहानुभूती तरीही विधानपरिषदेत का नाही फुटले शिंदें व दादांचे आमदार?
Ekanth Shinde: विद्यमान खासदारांना नकार मुख्यमंत्र्यांना पडणार महागात?; वाचा कसा होणार शिंदेंना तोटा

अर्थसंकल्प

नुकताच राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यामध्ये काही महत्त्वाचा योजना या जनतेसाठी घोषित करण्यात आल्या. याचबरोबर मोठ्या प्रमाणावर विकासनिधी हा देखील आमदारांना देण्यात आला. यात पाहायला गेलो तर, शिंदेंच्या आणि अजितदादांच्या आमदारांना हा निधी जरा जास्त मिळाला असं म्हटलं जात. यामुळे त्यांचे आमदार फुटले नाहीत असे मत व्यक्त केले जात आहे.

अशोक चव्हाण फॅक्टर

अशोक चव्हाण भाजप मध्ये गेल्यावर त्यांच्यासोबत अजून काही आमदार जातील अशी चर्चा होती. मात्र थेट न जाता विधानपरिषद निवडणुकीमध्ये या आमदारांनी भाजपला मत दिले असे म्हटले जात आहे. काँग्रेसची जी काही मतं फुटली, ते आमदार अशोक चव्हाण यांना मानणारे आमदार असावेत असे म्हटले जात आहे. याचबरोबर यातले काही आमदार हे अजित पवार यांच्या संपर्कात होते असेही म्हटले जात आहे.

Ajit Pawar: लोकसभेत पराभव, ठाकरे पवारांसोबत सहानुभूती तरीही विधानपरिषदेत का नाही फुटले शिंदें व दादांचे आमदार?
Ekanth Shinde: करिना आणि करिश्मा कपूर करणार शिवसेनेत प्रवेश?

अजित पवार किंगमेकर

लोकसभेच्या निवडणुकीनंतर 'अजित पवार संपले' असे चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रंगवले जात होते. काका पुतण्याच्या खेळामध्ये काकांनी पुतण्याला चितपट केले आहे असेच म्हटले जात होते. मित्रपक्ष ही अजित पवार यांच्यावर टीका करत होते. अशा सगळ्या अडचणींमध्ये अडकलेल्या अजित पवारांनी आज आपले आमदार आपल्या सोबतच आहेत हे दाखवून देत आपल्या बाजूला अजून काही आमदार जोडले असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे या निवडणुकीचे खरे किंगमेकर हे अजित पवारच असल्याचे म्हटले जात आहे.

नियोजन

विधान परिषदेचे आमदार हे सत्ताधारी पक्षांसोबत असतात असे चित्र असतं. कारण या आमदारांना वेळोवेळी निधी मिळतो. मात्र दोन महिन्यावर विधानसभा निवडणूक आली आहे. यामुळे ही निवडणूक तसं पाहायला गेलो तर महायुतीसाठी कठीण होती. मात्र सुसज्ज नियोजनामुळे महायुतीला ही निवडणूक जिंकता आली.

Ajit Pawar: लोकसभेत पराभव, ठाकरे पवारांसोबत सहानुभूती तरीही विधानपरिषदेत का नाही फुटले शिंदें व दादांचे आमदार?
Ekanth Shinde: भाजपकडून मुख्यमंत्र्यांचं खच्चीकरण सुरु आहे का? जाणून घ्या इनसाईड स्टोरी

लोकसभेची पुनरावृत्ती

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना दोघांवर अजूनही विश्वास वाटत आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्र नक्की कोणाला साथ देईल हे स्पष्टपणे दिसत नाहीये. लोकसभेत जे होतं ते विधानसभेत महाराष्ट्रात होतंच असं नाही. कित्येकदा लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निकालामुळे बरंच अंतर असतं. अशावेळी येत्या निवडणुकीमध्ये लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला होईलच असं कोणालाच वाटत नाही.

तर दुसरीकडे स्वतःकडे सहानुभूती आणि लोकसभेत जास्त जागा हे सर्व असताना देखील महाविकास आघाडीला आमदारांना आपल्या बाजूला वळवण्यात जमलेलं नाही. यामुळे हा महाविकास आघाडीसाठी एक प्रकारचा मोठा धक्का म्हटलं जात आहे. शिंदे आणि अजित पवारांची मते फुटतील असा महायुतीला वाटत होतं मात्र झालं भलतं.

Ajit Pawar: लोकसभेत पराभव, ठाकरे पवारांसोबत सहानुभूती तरीही विधानपरिषदेत का नाही फुटले शिंदें व दादांचे आमदार?
CM Ekanth Shinde : सीमावासीयांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र विभाग; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इकडे काँग्रेसचे आणि ठाकरेंची मतं फुटली असं चित्र पाहायला मिळत आहे.महाविकास आघाडीचा अती आत्मविश्वास कॉंफिडंस नडला असे म्हटले जात आहे. यामुळे ऐन निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी या धक्क्यातुन कसं बाहेर पडतं हे पहाण अतिशय उत्सुकतेच असणार आहे.

Ajit Pawar: लोकसभेत पराभव, ठाकरे पवारांसोबत सहानुभूती तरीही विधानपरिषदेत का नाही फुटले शिंदें व दादांचे आमदार?
CM Ekanth Shinde : मुख्यमंत्री शिंदे राज्यभर फिरणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.