Ajit Pawar Latest News : अजित पवार यांच्या महायुतीतील सामील झाल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवार सोबत आल्यामुळे शिंदे गटाच्या मंत्रिपदाला कात्री लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांची नाराजी दूर करण्याच्या कामाला लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून बुधवारी आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आणि त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. (Latest Marathi News)
अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी दिसून आली आहे. पवार यांच्या येण्यामुळे भाजप-शिंदे गटाच्या आमदारांना मिळणारी मंत्रिपदे कमी झाल्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी दिसुन येत आहे. तर भाजपमध्ये देखील नाराजी असल्याचं वक्तव्य काल शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे. तर आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाश शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल खलबतं सुरू झाली आहेत. शिंदे-फडणवीस यांच्यात नंदनवन बंगल्यावर चर्चा झाल्याची माहीती आहे. (Marathi Tajya Batmya)
दोघांमध्ये या बैठकीत नाराज आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटपावर चर्चा झाल्याचीही माहिती आहे. येत्या आठवड्याभरात विस्तार करण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाल्याची माहीती आहे. याबाबतचे वृत्त 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने दिले आहे.(Latest Marathi News)
'शिंदे गटचं नाही तर अजित पवारांच्या महायुती प्रवेशाने भाजपमध्ये देखील नाराजी'
शिंदे गटासोबतच भाजपचे देखील आमदार अजित पवार यांच्या महायुतीत येण्यामुळे नाराज झाले असल्याचे शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे. अजित पवार यांच्या महायुतीत येण्यामुळे सत्तेची पदं गेल्यामुळे शिंदे गटातच नाराजी पसरली नसून भाजपमध्ये देखील आहे, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. (Marathi Tajya Batmya)
शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी?
शिंदे गटातील अनेक आमदारांमध्ये नाराजी आहे. तर गरज नसतांना राष्ट्रवादीला सोबत का घेण्यात आले असा प्रश्न पडला असल्याचे संजय शिरसाट म्हणाले आहे. तसेच माझ्यासह अनेकजण मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचे देखील शिरसाट म्हणाले आहे. (Marathi Tajya Batmya)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.