Fadanvis: मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन बोलतो असं म्हणताच CM शिंदे गालात हसले...

Eknath Shinde and Devendra Fadnavis
Eknath Shinde and Devendra Fadnavis
Updated on

मुंबई - राज्यात उध्दव ठाकरे-शरद पवार यांचं सरकार जाऊन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार स्थापन झालं. राज्याचं नेतृत्व करण्याचा अनुभव असलेले फडणवीस नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. तर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. अर्थात फडणवीसांचा अनेक विषयातील अवाका मोठा आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांसमोरचा माईक घेऊन फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे ते ट्रोल झाले होते. विरोधकांनी देखील यावरून टीका केली होती. मात्र आजच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पुन्हा गंमतीदार किस्सा घडला आहे. (Eknath Shinde and Devendra Fadnavis news in Marathi)

Eknath Shinde and Devendra Fadnavis
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार; शिंदेंनी गजानन कीर्तिकरांची घेतली भेट

सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस अनेक पत्रकार परिषदा सोबत घेताना दिसतात. आज देखील मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर दोघांनी मिळून पत्रकार परिषद घेतली. गेल्यावर्षी कोरोनामुळं अनेक निर्बंध होते पण यंदा सर्व मंडळांची इच्छा लक्षात घेऊन दहीहंडी, गणेशोत्सव, मोहरम हे राज्यातील उत्सव साजरे झाले पाहिजे, अशी बैठकीत चर्चा झाली. कायदा-सुव्यवस्था राखून हे उत्सव साजरे झाले पाहिजेत अशा सूचना पोलीस, जिल्हा प्रशासनाला दिल्याची माहिती शिंदे-फडणवीस यांनी दिली.

पत्रकार परिषदेत आरे कारशेडचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी माईक आपल्या हातात घेत, मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन उत्तर देतो, अस म्हणत कारशेडच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं. यावरून फडणवीसांनी दाखवून दिलं की, आपण मुख्यमंत्र्यांचे प्रोटोकॉल पाळतो.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वारंवार अपमान होत असल्याची टीका केली होती. मात्र आज फडणवीस यांनी सावध भूमिका घेत बोलण्याआधी शिंदे यांची परवानगी घेतली.

दरम्यान पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना हिंदीत माहिती देण्याची विनंती केली होती. त्यानंतर फडणवीसांनी शिंदे यांना हिंदीत माहिती देण्यास सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी हिंदीत माहिती देण्यास सुरुवात करतातच फडणवीसांना हसू आवरत नव्हतं, हे कॅमेऱ्यात कैद झालं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()