Latest Wardha News: ‘‘पंतप्रधान मोदी यांच्या काळात महाराष्ट्राचाच नाही तर देशाचा विकास साधला जात आहे. या विकासाला विरोधी पक्ष विशेषतः काँग्रेसकडून नेहमी विरोध होत आहे. हा विरोध येत्या काळात काँग्रेसला भोवणार आहे,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात बोलताना केले.
स्वावलंबी शिक्षण संस्थेच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते अनेक प्रारंभही करण्यात आला. राज्याच्या विकासासाठी शंभर दिवसांचा सुरू असलेला कार्यक्रम ही केवळ एक झलक आहे. येत्या तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र वेगळ्याच आणि विकसित वळणावर दिसेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.