Shivsena: 'ढाल-तलवार' चिन्हाचा इतिहास! आधीचा अख्खा पक्षच झाला होता काँग्रेसमध्ये विलीन

Eknath Shinde balasahebanchi shivsena Two Swords and Shield symbol history with Peoples Democratic Movement
Eknath Shinde balasahebanchi shivsena Two Swords and Shield symbol history with Peoples Democratic Movement
Updated on

मुंबई : राज्यात अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगेलच तापताना दिसत आहे, निवडणूक आयोगाकडून शिवसेना हे नाव धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हाला मनाई करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला नवे चिन्ह दिले आहेत. यामध्ये ठाकरे गटाला धगधगती मशाल हे तर शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आलं आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का, यापूर्वी ढाल-तलवार चिन्ह असलेल्या अख्खा पक्षच कॉंग्रेसमध्ये विलीन केला होता.

निवडणूक आयोगाने 'मशाल' हे चिन्ह उध्दव ठाकरे गटाला दिल्यानंतर शिंदे गटाला काय चिन्ह मिळतं याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, दरम्यान शिंदे गटाला मिळालेल्या ढाल-तलवार चिन्हामध्ये दोन तलवारी आणि एक ढाल दिलेली आहे. दे चिन्ह मावळ्यांच्या पाठीवर दाखवण्यात येतं. त्या ढालीशी साधर्म दाखवणारं हे चिन्ह आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल-तलवार हे चिन्ह पोटनिवडणूकीत कितपत प्रभावी ठरेल हे पहावे लागणार आहे

Eknath Shinde balasahebanchi shivsena Two Swords and Shield symbol history with Peoples Democratic Movement
Ola Electric Scooter: अरे वा! लवकरच ओला घेऊन येतेय सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, काय असेल खास?

ढाल-तलवार हे चिन्ह आधी पीपल्स डेमोक्रॅटिक मूव्हमेंट या पक्षाचं होतं. पण या पक्षाची नोंदणी २००४ साली रद्द करण्यात आली आणि २०१६ पासून ते निवडणूक आयोगाच्या फ्री सिंबॉल यादीमध्ये समाविष्ट झालं. त्यामुळे हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या 'बाळासाहेबांची शिवसेना' या गटाला मिळालं.

Eknath Shinde balasahebanchi shivsena Two Swords and Shield symbol history with Peoples Democratic Movement
Balasaheb Thackeray: 'मशाल' चिन्हासोबत सेनेचं नातं जुनंच, बाळासाहेबांना मिळला होता मोठा विजय

काय आहे इतिहास..

पीपल्स डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (PDM) हा ईशान्य भारतीय मेघालय राज्यातील एक राजकीय पक्ष होता. 1997 मध्ये स्थापन झालेल्या, PDM ने 1998 च्या मेघालय विधानसभेच्या निवडणुकीत तीन जागा देखील जिंकल्या होत्या. मात्र नंतर 2003 च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही त्यानंतर डिसेंबर 2003 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) मध्ये हा पक्ष विलीन करण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.